22 जानेवारी नवयुग स्थापना दिन घोषित करून सार्वजनिक सुट्टी जाहीर करा -शिशिर जावळे यांची पंतप्रधानांकडे मागणी..

भुसावळ –मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामानी रावणासारख्या भस्मासुराला यम सदनी पाठविण्यासाठी व त्याचा अहंकार तोड ण्यासाठी जन्म घेतला. राक्षसी वृत्तीचा नायनाट होऊन समाजामध्ये धर्मामध्ये शांती प्रस्थापित हो सनातन धर्माची पताका कायम टिकन्यासाठी रावणाचा अहंकार उतरवून राक्षसी वृत्तींना वेळीच ठेचण्यासाठी अशा वृत्तींचा कायमचा नायनाट करण्यासाठी प्रभू श्री रामचंद्रांनी या पृथ्वीतलावर अवतार घेऊन सत युगाची मुहूर्त मेढ रोवली . मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम प्रभूंचं चरित्र एक आदर्श जीवनपद्धती ने जगणं शिकवत. दुराचारांचां नायनाट करून सदाचार निर्माण करणारेम्हणजे प्रभू श्री रामचंद्र, महत्तमातील महत्तम असं एक आदर्श व्यक्ती मत्व म्हणजे प्रभु श्रीरामचंद्र आहेत. आपल्यातील षडरीपून वर मात करण्याचे प्रेरणा देणार व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रभू श्री रामचंद्र., आई-वडिलांच्या थोरामोठ्यांचा सन्मान करून त्यांच्या आज्ञेत आपले कर्तव्य कर्म कसे पार पाडावेत हे प्रभू श्री रामचंद्रांच्या व्यक्तिमत्त्वातून आणित्यांच्या चरित्रातून , जीवनशैली मधून शिकण्यासारखा आहे. संयम, सदाचार, संस्कार, सहजता, सत सत विवेक बुद्धी, पराक्रम, शौर्य निडरता, निगर्वी,चारित्र्यसंपन्नता, म्हणजे प्रभू श्री रामचंद्र.. हिंदू धर्माच इष्ट दैवत आस्था आणि श्रध्देच स्थान म्हणजे प्रभू श्रीराम चंद्र. अशा या हिंदू धर्माचे आस्था श्रद्धास्थान असणार अयोध्येतील श्री राम मंदिराच्या निर्माणासाठी आणि तेथे प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून येणाऱ्या भावी पिढीला प्रभू श्रीरामांचा आदर्श घेण्याची प्रेरणा व ऊर्जा मिळावी म्हणून ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला अशा अयोध्येमध्ये शेकडो वर्षांपासून श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी हजारो कार सेवकांनी ,महात्म्यांनी, विविध स्तरातील कार्यकर्त्यांनी आपल्या प्राणांचीआहुती देऊन श्रीराम मंदिर निर्माण कार्यामध्ये आपलं फार मोठे योगदान दिलेल आहे. आणि येत्या 22 जानेवारी 2024 ला अयोध्ये मध्ये प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार असून त्या दिवशी हा मंगलमय सोहळा म्हणजे स्वर्गापासूनही पेक्षाही सुंदर असा सोडा असणार आहे आणि साक्षात पृथ्वीवर एका आदर्श विचारांची प्रेरणा आणि ऊर्जा देणार एक नवीन युगाची स्थापना सर्वसंमतीनेत्या ठिकाणी होत आहे. ही नक्कीच संपुर्ण विश्वासाठी, सनातन हिंदू धर्मियांसाठी आनंदाची गौरवाची आणि अध्यात्मिक उन्नतीची बाब आहे. म्हणून संपूर्ण विश्वाला प्रभू श्रीराम कळले पाहिजे, प्रभू श्रीरामांची आदर्श जीवनपद्धती कळली पाहिजे आणि उज्वल सर्वगुणसंपन्न सदाचारी विश्वाची निर्मिती व्हावी यासाठी या पवित्र दिवसाला म्हणजेच 22जानेवारी ला दरवर्षी नवयुग स्थापना दिन म्हणून जाहीर करण्यात यावा. व या दिवशी सार्वजनिक सरकारी सुट्टी सुद्धा जाहीर करावी. अशा आशयाची मागणी सामजिक कार्यकर्ते श्री.नमो विचार मंचचे अध्यक्ष शिशिर जावळे यांनीएका पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी , यांचे सह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे कडे केली असल्याचं श्री.नमो विचार मंचचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.