पालिकेचे तर्फे झालेले चुकीचे मालमत्ता पुनर्मूल्यांकन चौकशी व्हावी — शिशिर जावळे : ठेकेदारावर सेटिंगचे आरोप

भुसावळ –नुकताच भुसावळ नगरपालिकेतर्फे कोरोना काळात रखडलेल्या शासनाच्या कर निर्धारण नुसार तीन वर्षांनी मालमत्तांचे नुकतेच पुनर्मूल्यांकन करण्यात आले. व त्यात पालिका हद्दीत वाढलेल्या नवीन व जुन्या मालमत्तांवर दहा टक्के कर वाढ जाहीर करण्यात आली .
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सन 2020 -21 मध्ये दर तीन वर्षांनी पालिका क्षेत्रात शासनाच्या करनिर्धारण नियमानुसार मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक होते. मात्र ही प्रक्रिया कोरोनामुळे रखडलेली होती 2022 मध्ये सुरू झाली. भुसावळ शहरांमध्ये 2023- 24 2026- 27 या चार वर्षांसाठी जुन्या मालमत्ता भूखंड सुधारणा व नवीन बांधकाम झालेल्या मालमत्तांचे मोजमाप करून भुसावळ पालिकेने सप्टेंबर मध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली. आणि पालिका हद्दीत वाढल्या नवीन मालमत्ता व जुन्या मालमत्तांवर दहा टक्के करवाढ करण्याचा निर्णय भुसावळ नगरपालिका प्रशासनाने घेतलेला आहे. त्यानुसार संबंधित मालमत्ताधारकांना नवीन पुनर्मूल्यांकन कर निर्धारण पत्रक वित रीत केले जात असून याबाबतीत दिनांक 15 नोव्हेंबर पर्यंत नागरिकांकडून हरकती मागवण्यात आलेल्या आहे.
गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून सातत्याने अ दर्जा असलेल्या भुसावळ नगरपालिके कडून शहरांमध्ये नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या मूलभूत सेवा सुविधा कराच्या मोबदल्यात पुरविल्या जात नाही , तसेच कर पत्रकावर नमूद असलेल्या विविध सेवा सुविधां न पुरविता कर वसूल केला जातो. भुसावळ नगरपालिकेतर्फे शासनाच्या कर निर्धारण नियमानुसार नागरीकांना वाटप करण्यात येत असलेल्या मालमत्ता पुनर्मूल्यांकन पत्रकात प्रचंड चुका आहेत. एका लक्ष्मी नारायण मंदिर ट्रस्टच्या नावाने दिलेला मागणी पत्रकांवर मंदिर ऐवजी इमारतींचे फोटो टाकण्यात आलेले आहेत तसेच काही ठिकाणी घरमालकाचे इमारतीचा फोटो नाव मात्र दुसऱ्याच मालमत्ता धार कांचे आहे. मालमत्ता धारकांना दिलेल्या मागणी पत्रात इतर मालमत्तांचे फोटो टाकण्यात आले तर बऱ्याच करपत्रका मध्ये मालमत्ता धारकांचे बांधकामाचे प्रकार बदललेले आहेत, पत्र्याचे बांधकाम असताना स्लॅप असल्याचा तपशील त्यात टाकण्यात आलेला आहे तर बऱ्याच नागरिकांचे मालमत्तांचे चटई क्षेत्राचे आकारमान अधिक आहेत. यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप होत आहेत.या आणि अशा अनेक चुका या कर मालमत्ता पत्रकात आढळत आहेत. तसेच भुसावळ शहरातील बऱ्याच काही भागात मालमत्ता पुनर्मूल्यांकन कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने एजन्सी यांनी तोंड बघून आर्थिक फायद्यासाठी नागरिकांच्या मालमत्तांचे चटई क्षेत्र कमी दाखविलेले आहे. काही ठिकाणी मालमत्ता धारकांच्या घरात भाडेकरू असल्यावर सुद्धा ती नोंद नमूद केली नाही. तसेच भुसावळ शहरातील काही अपार्टमेंट मध्ये सुद्धा , अपार्टमेंटमधील पार्किंगच्या व इतर काही बाबतीत चटई क्षेत्र मूल्यांकन अंदाजित केलेले आहे यात सुध्दा दुजा भाव केलेला आहे. तसेच काही ठिकाणी मालमत्तांचे फक्त फोटो काढून अंदाजित चटई क्षेत्र नमूद केले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते साई निर्मल फाउंडेशन, तथा श्री नमो विचार मंचचे अध्यक्ष शिशिर जावळे यांनी केलेला असून पालिकेतर्फे होणाऱ्या या चुकीच्या मालमत्ता पुनर्मूल्यांकन ठेक्याची उच्च स्तरीय त्वरित चौकशी करून सदर ठेकेदारावर त्वरित कारवाई करून त्यांचा ठेका रद्द करण्यात यावा . तसेच ज्याच्या नागरिकांच्या मालमत्ता मध्ये चुका करण्यात आलेल्या आहेत अशा सर्वांना घरपोच जाऊन दुरुस्ती करून देण्यात याव्यात. तसेच पुन्हा संपूर्णभुसावळ शहरातील कर देय असलेल्या सर्व मालमत्ता नचे निःपक्ष पणे पुनर्मूल्यांकन न झाल्यास तसेच दहा टक्के झालेली कर वाढ रद्द केल्यास या विरुद्ध व्यापक स्वरूपात जन आंदोलन करणार असल्याचं पत्र जावळे यांनी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभाग, संबंधीत मंत्री तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांना पाठवले असल्याच त्यांनीएका प्रसिद्धी पत्रकां द्वारे कळविलेले आहे.