धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस शिक्षा :


भुसावळ – येथील चौथे जुडिशन मॅजेस्ट्रेट वर्ग एक श्री खंडारे साहेब यांच्या कोर्टाने आज एल के पी सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत डिमॅट अकाउंट चालवणारे आरोपी नामे नागेश खोतकर यास पन्नास हजार रुपयांच्या एकूण सहा धनादेश यांच्या अनादर प्रकरणी न्यायालयाने अर्जदार अरविंद सेवकराम पाटील यांना दिलेल्या धनादेशाचे अनादरन प्रकरणी रक्कम रुपये 57 हजार 500 (एकूण चेक सहा) प्रत्येकी दंड व एक महिन्याची शिक्षा सुनावली असून सदर धनादेश हे अर्जदार यांना डिमॅट अकाउंट मध्ये गुंतवलेल्या रकमेच्या मोहबदल्या पोटी आरोपी यांनी अर्जदार यांना दिलेले होते सदरची रक्कम आरोपीने अर्जदार यांना मुदतीत परत न केल्यामुळे अर्जदार यांना आपण फसवल्या गेल्याची शंका आल्याने अर्जदार यांनी आरोपी वारंवार गुंतवलेल्या रकमेचे काय झाले अशी विचारणा केली होती त्यावेळेस आरोपी येणे अर्जदार यांना गुंतवलेल्या रकमेचे चेक अर्जदार यांना ते राहात असलेल्या पत्यावर पाठवलेले होते अर्जदार यांनी सदरचे चेक वटवण्यासाठी त्यांच्या बँक खाते असलेल्या बँकेत पटवण्यासाठी टाकले असता सदर खात्या आरोपीच्या खात्यावर रक्कम नसल्याबाबत अर्जदार यांच्या बँकेने सांगितले अर्जदार यांनी याबाबत त्यांचा धनादेश जो डिमॅट अकाउंट मधील कमिशन पोटी आरोपी याने दिलेला होता सदरचा धनादेश बाऊन्स झाल्या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती व न्यायालयात धनादेश अनादरन प्रकरणी एकूण सहा केस दाखल केल्या SCC 685/2021—- SCC690/2021 अशी प्रकरण दाखल केले.
न्यायालयाने सर्व साक्षी पुरावे यांचा सविस्तर विचार करून व सत्य परिस्थिती चे अनुलोकन करून आरोपी सहा दणदिश अनादरन प्रकरणी शिक्षण सुनावलेली आहे सदर केस मध्ये अर्जदार यांच्याकडून एडवोकेट अश्विनी डोलारे व एडवोकेट मोनालीसा खान एडवोकेट संतोष कलंत्री यांनी काम बघितले तर आरोपीतर्फे एडवोकेट अनिल मोरे व एडवोकेट महेश भोकरीकर यांनी काम बघितलेले आहे