भुसावळ – येथील न्यायालयात दिनांक 21 जून रोजी तालुका विधी सेवा समिती व भुसावळ वकील संघ यांनी संयुक्तिकरित्या जागतिक योग दिनानिमित्त “योगाद्वारे शारीरिक मानसिक व आध्यात्मिक आरोग्य ” या विषयावर व्याख्यान आयोजित केले.
योग दिनानिमित्त भुसावळ न्यायालयात योगाद्वारे’ शारीरिक मानसिक व आध्यात्मिक आरोग्य या विषयावर पतंजली योगशिक्षिका सौ महानंदाताई पाटील यांनी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाचे वक्ते सौ महानंदा पाटील यांनी योगा निरोगी राहण्यासाठी किती गरजेचे आहे त्यासाठी कशा पद्धतीने आपली दिनचर्या आहार असावा ॲक्युपंक्चर चा वापर कसा करावा तसेच निरोगी आरोग्य हे मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली कशी आहे हे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले
सौ अंजली वाघमारे योग शिक्षिका यांनी योग प्रात्यक्षिक करून दाखविले वकील संघाचे अध्यक्ष ॲड तुषार पाटील यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना चांगल्या मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी योग कसा महत्त्वाचा आहे सांगितले
न्यायाधीश, वकील, कोर्ट कर्मचारी नेहमीच कामात व्यस्त असतात दिवसभर बैठे काम असते त्यामुळे अनेक व्याधीना आमंत्रण मिळत असते म्हणून प्रत्येकाने योगा केला तर व्याधी व आजारां पासून दूर राहू शकतो असे मत अध्यक्षीय भाषणात माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.टी सूर यांनी मांडले
या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश 2 व्हि.सी बर्डे , जिल्हा व सत्र न्यायाधीश आर एम जाधव, व्ही एस मोरे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, श्रीमती हेमा पाटील सह दिवाणी न्यायाधीश व.स्तर, आर एस पांजणकर सहदिवाणी न्यायाधीश व.स्तर ,श्रीमती के एस पत्रे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर , न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती एस. व्हि.जंगम स्वामी, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर डी.बी.डोमाळे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर के.एस.खंडारे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती एस् व्हि. न्यायाधीश उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला प्रतिनिधी अँड जास्वंदी भंडारी (पाटील )यांनी केले आभार प्रदर्शन दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर के एस खंडारे यांनी केले सदर करण्यासाठी वकील संघ सहसचिव ॲड. पुरुषोत्तम पाटील भुसावळचे न्यायालयीन कर्मचारी यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाला सर्व वकील, कर्मचारी, पक्षकार उपस्थित होते



