भुसावळात लेवा समाज विकास मंथन बैठकीचे २५ जून रोजी आयोजन :

भुसावळ – लेवा समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी युवा फोरम स्थापन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्यानिमित्त विचार विनिमय करण्याकरिता रविवार दिनांक २५ जून रोजी भुसावळ शहरातील रामानंद हॉल जळगाव रोड भुसावळ येथे सकाळी १० ते दुपारी 3 वाजता मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे . तरी लेवा पाटील समाजातील सर्व बंधू व भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मीटिंगमध्ये खालील विषयावर चर्चा करण्यात येणार आहे

समाज संघटित करणे व समाज प्रबोधन करणे . पावागड पासून एकता ज्योत घेऊन समाज बांधव असलेल्या गावागावात नेणे व शेवटी समारोप ठिकाणी महामेळाव्याचे नियोजन करणे, समाजात बेरोजगारी वाढली यावर मार्ग काढणे, शेतकरी बांधवांचे प्रश्नावर गांभिर्याने विचार विनिमय करणे. शेतकरी बांधवांची लूट व्यापारी वर्गाकडून होत आहे त्याला आळा बसविणे व अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे. युवा फोरम तयार करणे , समाजात अलीकडे घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढलेले आहे ते कमी कसे करता येईल यावर चर्चा करणे. लग्न वेळेवर न लागणे. लग्नात अवास्तव खर्च प्री वेडिंग तसेच डीजेचा सर्रास वापर बंद करणे. शिक्षित समाज असून सुद्धा सामाजिक आर्थिक व राजकीय दृष्ट्या समाज मागे जात आहे . याबद्दल विचारविनिमय करणे. युवक युवतींना इतर स्पर्धा परीक्षांमध्ये मार्गदर्शन कसे उपलब्ध होईल यावर विचार करणे. पुढील नियोजन व कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या समित्या करणे व जबाबदारी वाटप करणे . प्रत्येक भागातील व्यक्तींना प्रतिनिधित्व देणे. दर महिन्याला आढावा बैठकीचे नियोजन करणे. आदी विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. तरी लेवा पाटील समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.