जळगाव –
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जळगाव तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत आयोजित रंगभरण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या चित्रात विविधांगी रंग भरून आपल्या कलेचे दर्शन घडवले.
छत्रपती शिवरायांचे चित्र हे मोठ्या ड्रॉईंग शिटवर विद्यार्थ्यांना देवून आपल्या कलाकौशल्यांचा वापर करून चित्र रंगविण्याचे सांगण्यात आले. त्यासाठी शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांना मोकळेपणाने बसविण्यात आले. त्यात पहिली ते आठवीच्या सुमारे शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून छत्रपती शिवरायांच्या चित्रात कोरडे व ओले रंग भरून चित्र आकर्षकरित्या रंगवले. त्यानंतर या सर्व चित्रांचे परीक्षण करण्यात येवून विजेते जाहिर करण्यात आले. त्यात पहिली व दुसरीच्या गटातून प्रथम रोहन शिवाजी सोनवणे, द्वितीय अरशद गुलाब पिंजारी तर तृतीय इरफान शेख शरिफ आला. तिसरी व चौथीच्या गटातून प्रथम अश्विनी विजय मोरे, द्वितीय गौरव भरत वाणी तर तृतीय समीरशहा रहिमशहा फकीर आला. पाचवी ते आठवीच्या गटातून प्रथम अमोल राजू राठोड, द्वितीय दिपाली रोहिदास सोनवणे तर तृतीय महेक फिरोज शेख आली. विजेत्या विद्यार्थ्यांना शिवजयंतीनिमित्त दि. १९ रोजी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. रंगभरण स्पर्धा यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक देविदास वाल्हे, संतोष वानखेडे, रमेश सूर्यवंशी, विनोद जयकर, डॉ. जगदीश पाटील, मंजुषा पाठक, साधना सूर्यराव, सुनंदा रोझोदकर, सविता निंभोरे आदींनी परिश्रम घेतले.



