शिवजयंती उत्साहात व आंनंदाने साजरी करावी – पो.नि.दिलिप भागवत शिव जयंतीच्या मिरवणुकीत डीजेला बंदी

भुसावळ ( प्रतिनिधी ) –
तरुणांइने छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे तसेच मद्यप्राशन न करता शिवजयंती उत्साहात व आंनंदाने साजरी करावी ऐसे आवाहन पो.नि.दिलिप भागवत यांनी केले .
येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनला (शासकीय तारखेनुसार) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त वैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करतांना पो नी दिलीप भागवत बोलत होते .
मिरवणूक काढणाऱ्या शहरातील कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली शिव जयंतीच्या मिरवणुकीत डीजेला बंदी असल्याची सूचना पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी दिली.
श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त बाजारपेठ पोलीस स्टेशनला बैठकीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी मागील वर्षी आलेल्या अडचणी ह्या वर्षी येऊ नये यासाठी पो.नि भागवत यांचे सोबत चर्चा केली. चर्चा एकूण उपस्थितांच्या प्रश्नांचे निरसन पो नी भागवत यांनी केले .
यावेळी मिरवणुकीत घोडे तसेच सजीव देखावे सादर करणार असल्यास याबाबत माहिती देवून परवानगी घ्यावी .तसेच शिव जयंतीच्या दिवशी तरुणांनी मद्यप्राशन करून मिरवणुकीत सहभागी होऊ नये .डी जे वाजवू नये वाजविल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल.मिरवणूकीसाठी कार्यकर्त्यांनी वेळेचे भान ठेवून रात्री 10 वाजेच्या दरम्यान वाद्य बंद करणे बंधनकारक आहे.अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती वजा ताकीद पो.नि. निरीक्षक दिलीप भागवत यांनी दिला. बैठकीला बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी,पो.हे.कॉ.नंदकिशोर सोनवणे, पो.ना.संदीप परदेशी,पो.कॉ.सचिन पोळ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *