हतनुर धरणगाळ मुक्त करा –शिशिर जावळे यांची फडणवीसांकडे मागणी.

भुसावळ–महाराष्ट्र राज्यातील काही प्रमुख धरणांचाअत्याधुनिक पद्धतीने गाळ काढून त्या धरणामध्ये पाणीसाठा वाढवा व त्या पाण्याचा शेतकऱ्यांसाठी, उद्योग धंद्यांसाठी तसेच सर्व जनतेला उपयोग व्हावा . या करिता राज्यातील उजनी, गिरणा ,गोसेखुर्द ,जायकवाडी मुळा पाच प्रमुख धरणांमधील गाळ काढण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच जल संपदा तथा उपमुख्यमंत्री मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. येत्या दोन महिन्यांमध्ये याबाबत निविदा निघणार आहे. . त्यामुळे यामाध्यमातून गाळ मुक्त धरण ,गाळमुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांना मोफत गाळ देण्यात येईल अशी घोषणा नुकतीच देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. या योजनेमध्ये राज्यातील प्रमुख पाच धरणांचा उल्लेख केलेला आहे . जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील प्रसिद्ध हतनुर धरण कायम गाळाने भरलेलं असतं . आपावेतो त्या धरणाचा गाळ काढलेला नाही त्यामुळे तेथील पाणीसाठा आणि जलस्तर सरकार सातत्याने कमी असतो. यामुळे भुसावळ तालुका परिसरातील शेतकऱ्यांना, एमआयडीसी उद्योगधंद्यांना, रेल्वेला दीपनगर औष्णिक केंद्राला, सर्वसामान्य जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र टंचाईला नेहमीच सामना करावा लागतो . जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हतनुर धरणातील गाळ पावसाळ्यापूर्वी त्वरित काढावा. व परिसरातील शेतकऱ्यांना हा गाळ मोफत देण्यात यावा,व या राज्यातील प्रमुख धरणामधील काढण्याच्या प्रक्रियेत निविदेत हतनुर धरणाचा सुद्धा समावेश करण्यात यावा मागणी सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा जलसंपदामंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याच त्यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविलेले आहे .