भुसावळ – 31 डिसेंबर तसेच एक जानेवारी 2023 अर्थात नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहर व उपविभागामध्ये पोलीस विभागाकडून संपूर्ण विभागात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

भुसावळ शहरांमध्ये सात ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आलेली आहे. त्याशिवाय शहरात पेट्रोलिंग नेमण्यात आलेली आहे महत्त्वाच्या ठिकाणी फिक्स पॉईंट लावलेले आहे.
दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर केसेस करण्यात येणार आहे याशिवाय रॅश ड्रायव्हिंग, विना नंबर वाहन,अल्पवयीन वाहन चालक यांच्यावर सक्त कारवाई आहे,.नाकाबंदीआज रात्री आठ वाजेपासून तर पहाटे पाच वाजेपर्यंत राहणार आहे..
याशिवाय ग्रामीण भागात देखील हॉटेल धाबे या ठिकाणी दारू विक्री होते किंवा काही यासाठी पोलिसांकडून पथके तयार करण्यात आलेली आहे.
नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात परंतु शांततेत करावे कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन भुसावळ उपविभागीय पोलिस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे .


