भुसावळ -भुसावळ अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयास
जिल्हा व सत्र न्यायाधीश जळगाव एम. क्यू एस.एम.शेख यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी भुसावळ वकील संघातर्फे न्यायधिश शेख यांचा ऍड तुषार पाटील यांनी सत्कार केला . तसेच भुसावळ वकिलांच्या विविध समस्या व वकिलांना सोयी सुविधा पुरवण्या संदर्भात शेख साहेब यांना माहिती देवून विविध मागणी करण्यात आल्या .

या मागण्यांमध्ये प्रामुख्याने कोर्ट कॅन्टींग , एडवोकेट कंझूमर सोसायटीसाठी जागा , नवीन इमारतीमध्ये वकील संघाला मोठी बाररूम , बोदवड न्यायालय इ कोर्ट ऍप्स वर सुरू करणे , तसेच चार चाकी वाहनासाठी पार्किंगची व्यवस्था , न्यायालय परिसरात सीसीटीव्हीची व्यवस्था करावी , न्यायालयाच्या गेटवर कायमस्वरूपी वाहतूक पोलिसाची नेमणूक करणे, तसेच न्यायालयाचे आवारात पोलीस चौकीची व्यवस्था करणे , त्याचप्रमाणे मोटर अपघात दावा प्राधिकरणाचे दावे लोक अदालत भुसावळ येथे करणे इत्यादि विषयांबाबत मागणी करण्यात येवून चर्चा करण्यात आली . . प्रसंगी न्यायधीश शेख यांनी मनोगत व्यक्त करताना वकील संघातील वकिलांच्या सर्व मागण्या सकारात्मकरित्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. त्यानंतर प्रत्यक्ष नवीन बांधकामाच्या इमारतीला भेट देऊन तेथील बांधकामाची पाहणी केली
यावेळी वकील संघातर्फे आयोजीत सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.रम्मु टी पटेल यांनी केले. प्रसंगी भुसावळ वकील संघाचे उपाध्यक्ष एडवोकेट धनराज पी.मगर सहसचिव एडवोकेट पुरुषोत्तम पाटील, सदस्य एडवोकेट विजय तायडे, ॲड.विश्वंभर वाणी त्याचप्रमाणे भुसावळ वकील संघातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.


