प्रतिष्ठा महिला मंडळ द्वारा आयोजित महिला उद्योजक मेळाव्यात झाली लाखोंची उलाढाल: भुसावळकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ;


भुसावळ – प्रतिष्ठा महिला मंडळ द्वारा गेल्या दहा वर्षा पासून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या तीन दिवशिय मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.या वर्षी सुद्धा या मेळाव्यात महिलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली.
*सदर मेळ्याव्याला भुसावळकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद* भुसावळकरांनी भरभरुन प्रतिसाद देत मेळाव्याला यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. तीन दिवसात भरपूर सामानाची विक्री झाली ज्यात लाखांची उलाढाल झाली..
या मेळाव्याच्या माध्यमातून महिलांनी बनविलेल्या वस्तूची विक्री तर झालीच परंतु त्याच बरोबर त्यांना ऑर्डर सुद्धा मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता…त्याच बरोबरीने आपल्याला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्या बद्दल आमदार संजय सावकारे, मंडळाच्या अध्यक्ष सौ रजनी सावकारे व त्यांच्या संपूर्ण टीम चे आभार मानले.पैसे देऊन सुध्दा असे नियोजन होत नाही तसे नियोजन दर वर्षी प्रतिष्ठा महिला मंडळाने निःशुल्क उपलब्ध करून दिले ही बाब कौतुकास्पद आहे व मंडळाच्या या उपक्रमा मुळे आमची दिवाळी ही अतिशय चांगली जाईल असे आवर्जून महिलांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.या मेळाव्यात सर्व स्तरातील महिलांचा सहभाग होता यात ग्रामीण भागातील महिलांनी सुद्दा सहभाग नोंदविला. कु-हा,साकेगाव,वरणगाव,
फुलगाव,फेकरी,कंडारी येथील महिलांनी प्रदर्शनात सक्रिय सहभाग घेतला.
या मेळाव्याला खासदार रक्षा खडसे यांनी सदिच्छा भेट देऊन मंडळाच्या कार्याचे कौतूक केले व महिलांना मार्गदर्शन केले.
या मेळाव्याला भुसावळ शहरातील प्रतिष्ठित लोकांनी भेट दिली व मंडळाचे कौतुक करून भरपूर खरीदी चा आनंद घेतला.
यामध्ये बियाणी ग्रुप च्या सचिव सौ संगीता बियाणी,भुसावळ डी वाय एस पीच्या पत्नी सौ ओवी वाघचौरे,भारतविकास परिषद च्या माजी अध्यक्षा डॉ नीलिमा नेहते,डॉ संजय नेहते,डॉ सौ मृणाल पाटील, महिला क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा सौ आरती चौधरी,पतंजली संस्थेच्या सौ महानंदा पाटील,पिंकेथॉनच्या सौ माधुरी गुर्जर,डॉ अर्चना खानापूरकर, डॉ खानापूरकर, रोटरी ताप्ती व्हैली अध्यक्षा सौ नूतन फलक ,सप्तपुट कलानिकेतनचे प्राचार्य अतुल मालखेडे ,सौ कविता कोठारी आदी मान्यवरांनी भेट दिली व महिलांमध्ये असलेल्या कलागुणाचे कौतुक केले….
एकूण 94 स्टॉल सहभागी :
जागे अभावी अनेक महिलांना नाही सांगावे लागले
अमरावती,नाशिक,बोदवड,
मलकापूर, जामनेर, जळगाव येथून महिलांनी स्टॉलची मागणी केली होती परंतू प्रामुख्याने फक्त भुसावळ तालुक्यातील महिला त्यातच ग्रामीण भागातील महिलांना प्राधान्य दिले