भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हा पानांचे चौफुलीवर विविध मागण्यांसाठी रास्ता आंदोलन करण्यात आले.यावेळी रस्त्याच्या दोघेही बाजुंनी दोन किलोमीटर पर्यत वाहतूक ठप्प झाली होती.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,नाहाटा कॉलेज ते सुरनदी रस्त्याची दुरुस्ती संदर्भात अतुल रवींद्र पाटील सामाजिक कार्यकर्ते यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग भुसावळ यांच्याकडे वारंवार निवेदन दिल्यानंतरही फक्त आश्वासन मिळत असल्याने तिन दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले गेल्यामुळे दिनांक १७ ऑक्टोबर रोजी कुऱ्हा पानांचे चौफुलीवर सकाळी ११ वाजेला रास्ता रोको करण्यात आला.यावेळी रस्त्याच्या दोघे बाजुंनी दोन किलोमीटर पर्यत वाहतूक ठप्प झाली होती.गेल्या दीड-दोन महिन्यापासून राखेचे ओव्हर लोड डंफर गावामधून जात आहे.रस्त्याचे खड्डे बुजविणे,रस्त्याचे सिलकोट व कारपेट करण्यात यावे.रस्त्याच्या साईड पट्ट्यावरील दोघे बाजूंची झाडे-झुडपे काढून स्वच्छता करण्यात यावी.गावातील दोघ शाळेजवळ स्पीड ब्रेकर लावून वाहने हळू चालविण्याचा बोर्ड लावण्यात यावा.महाराष्ट्र ढाबा ते सुरनदी पर्यतच्या काम करणारे संबंधित मक्तेदार यांच्यावर कारवाई करण्यात येऊन त्यांचे परवाना रद्द करण्यात यावा असे विविध मागण्यासाठी कुऱ्हा पानांचे चौफुलीवर विविध मागण्यांसाठी रास्ता आंदोलन करण्यात आले.
जो पर्यत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लेखी स्वरूपात मिळत नाही तो पर्यत रास्ता रोको आंदोलन सुरू राहणार असल्याच्या ठाम मतावर आंदोलन कर्ते बसून होते.सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सी.डी.तायडे यांनी आंदोलन कर्त्याना सर्व मागण्या १० दिवसांत पूर्ण करण्या संदर्भात लेखी पत्र दिले यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.आंदोलन तब्बल ३५ मिनिट चालले. यावेळी शाळकरी मुले,शेतकरी,त्याचप्रमाणे बाहेर गावी नोकरीसाठी जाण्याऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
आंदोलन स्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सी.डी तायडे शाखा अभियंता पी.यु. ठाकुर व स्था.सहाय्यक निलेश मंडवाले उपस्थित झाले.त्यांनी आंदोलन कार्याचे म्हणने ऐकून घेऊन दहा दिवसांत सदर रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहतुक सुरळीत करण्याचे सांगितले.या उपविभागाचे अंतर्गत असलेले बऱ्याचशा रस्त्यावर दीपनगर येथील राखेची प्रमाणापेक्षा जास्त अवजड व सततची वाहतुकीमुळे रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे.तसेच वारंवार होणाऱ्या अवकाळी पावसामुळे खड्ड्यात पाणी साचत असल्याने खड्डे भरण्यास विलंब होत आहे.
तसेच विलास पाटील (भारती कन्स्ट्रक्शन) यांनी फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान जे काम कुऱ्हा पासून ते सुरनदी पर्यंत केले होते तेथे अंदाजे १५००.० मीटर लांबीत कारपेटचे काम खराब आलेले आहे. ते काम मक्तेदाराने नवीन करण्याबाबत दुरध्वनीव्दारे सांगितले आहे.त्याचप्रमाणे नाहाटा कॉलेज ते सुरनदी पर्यतची लांबी निविदास्तरावर असून निवीदा मंजूर आल्यावर त्वरीत हाती घेऊन नवीन काम सुरु करण्यात येईल.


