उत्तर महाराष्ट्रात धडाडणार आदित्य ठाकरेंची तोफ, ‘शिवसंवाद’ यात्रेच्या चौथा टप्प्याला 20 ऑगस्टपासून सुरुवात :

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या ‘शिवसंवाद’ यात्रेचा चौथा टप्पा शनिवार 20 ऑगस्टपासून सुरू होत आहे. आदित्य ठाकरे या दौऱ्यात जळगाव इथल्या पाचोरा, धरणगाव, पारोळा, धुळे आणि मालेगाव येथील जनतेशी संवाद साधणार आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. गद्दार आमदारांच्या मतदारसंघात तर झंझावातच निर्माण झाला होता. आदित्य ठाकरे यांच्या स्वागताला, सभेला होणारी प्रचंड गर्दी पाहून विरोधकांची छातीच दडपून गेली आहे. ही शिवसंवाद यात्रा आता उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने रवाना होणार आहे.

शिवसंवाद यात्रेचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे

शनिवार 20 ऑगस्ट – दुपारी 12 वाजता – पाचोरा, दुपारी 1.45 वाजता – धरणगाव (जळगाव ग्रामीण), दुपारी 3.00 वाजता – पारोळा (एरंडोल), सायंकाळी 4.35 वाजता – धुळे, सायंकाळी 6.30 वाजता – मालेगाव

तिसरा टप्पा रायगडमध्ये धडकणार

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरूवात होणार आहे. रायगड जिल्ह्यातल्या दोन ठिकाणी आदित्य ठाकरेंच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या अलिबाग आणि महाडमध्ये आदित्य ठाकरेंचा झंझावात पहायला मिळेल.