गुरू हे संवेदनशील असतात – प्राचार्य उत्तम सुरवाडे :


भुसावळ – संगणकाची कितीही क्रांती झाली तरी गुरुची जागा ते कधीही घेऊ शकत नाही कारण गुरू हे संवेदनशील असतात आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक जडणघडणी सोबत माणुसकी विकसित होते असे प्रतिपादन प्राचार्य प्रा.उत्तम सुरवाडे यांनी केले.गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून येथील शिवसैनिक तथा शिवभोजन केंद्राचे संचालक उमाकांत शर्मा (नमा) यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात गुरूजनांचा सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.भुसावळ येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात गुरूपौर्णिमेचा कार्यक्रम पार पडला.

शिवसैनिकांच्या हस्ते गुरूजनांचा सन्मान :
शिवसेनेतर्फे समाजात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या गुरूंजणांच्याप्रती आदरभाव व्यक्त करून त्यांचे ऋण याप्रसंगी व्यक्त करण्यात आले.

यावेळी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आणि हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समाज घडवणाऱ्या गुरूजनांना यावेळी भगवी शाल, पेन, पुष्प व चांदीचा शिक्का देऊन सन्मानित करण्यात आले. शिवसैनिक उमाकांत शर्मा (नमा) यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात इलियास शेख, डॉ. जगदीश पाटील, प्रा. उत्तमराव सुरवाडे, गजानन नीळे, संतोष सोनवणे, प्रा. धीरज पाटील आदी गुरूजनांचा उपस्थित शिवसैनिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन देवेंद्र पाटील यांनी तर आभार आयोजक उमाकांत शर्मा (नमा) यांनी मानले. प्रसंगी प्रा. उत्तमराव सुरवाडे, संतोष सोनवणे, ललित मुथा, धीरज पाटील, नीलेश महाजन, बबलू बऱ्हाटे, मुकेश गुंजाळ, सूरज पाटील, उमाकांत शर्मा (नमा), राकेश खरारे, अरूण साळुंखे, हेमंत खंबायत, जवाहर गौर, शरद जोहरे, धीरज वरढोनकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.