भारत पाकिस्तान युद्धात सहभागी असलेला T-55 टँक भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी इस्टेटमध्ये दाखल :

भुसावळ – 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धात
सहभागी असलेला
T-55 टँक
आता ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ इस्टेटच्या कुशीत शोभेच्या स्वरूपात उभा असून आज दिनांक 20 मे 2022 रोजी त्याचे अनावरण ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळचे महाव्यवस्थापक वसंत निमजे यांच्या हस्ते करण्यात आले.
हा एक ऐतिहासिक टँक आहे जो 1960 मध्ये भारतीय सैन्याचा भाग बनला होता. जगातील सर्व देशांमध्ये ह्वा सर्वात जास्त वापरला जाणारा टँक आहे.
त्याच्या वर 100 एम एम ची मुख्य तोफ असते,
दोन 7. 6 एम एम च्या मशीन गन आणि एक 12 . 7 एम एम ची विमानभेदी तोफ बसवलेली असते
1971 च्या भारत-पाक युद्धात T-55 टँकने मोठी भूमिका बजावली होती.
युद्धाच्या शेवटी, भारतीय सैन्याने दावा केला की 226 पाकिस्तानी टँक नष्ट केले गेले.
या टँकमध्ये कमांडर, गनर, लोडर आणि ड्रायव्हर अशा 4 सैनिकांची टीम टँकला चालवते.
हा जगातील एकमेव टँक होता की त्या काळात युद्धात शत्रूचा पराभव करण्यास सक्षम मानला जात होता,
या टँकचे वजन 36हजार किलो असून .ताशी 50 किमी वेगाने चालतांना 14 कि.मी दुर अंतरापर्यंतच्या लक्ष्यांवर अचुक मारा करू शकते .
हा टँक सर्व भुसावळवासीयांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला आहे. प्रसंगी कार्यक्रमात (OSD).ए.एस.भटनागर
(A.GM) सुकांता सरकार दीपशिखा महिला कल्याण समितीच्या उपाध्यक्षा श्रीमती सुदिप्ता सरकार .
सचिव श्रीमती पूनम प्रजापती व त्यांच्या सर्व पदाधिकारी महिला
सर्व युनियन असोसिएशनचे पदाधिकारी, जेसीएम, थ्री, जेसीएम, फोर्थ सदस्य, कार्यकारिणी सदस्य आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती
या टँकचे मेंटेनन्स , कलरिंग व सजावट लायटींग आणी फाउंडेशनच्या उभारणीत सहकार्य करणारे विभागांचे अधिकारी, कर्मचारी सुद्धा उपस्थित होते. त्यावेळी महाव्यवस्थापकांनी त्या सर्वांचे र्कौतुक केले.अशी माहिती ऑ.फॅ भुसावळचे (पीआरओ) बी. देवीचंद (डीजीएम) यानी दिली