सेवानिवृत्त पोस्ट मास्टर युनूस खान यांचा जि प शाळेच्या प्रगतीसाठी पुढाकार : कुऱ्हे पानाचे येथील जि प उर्दू शाळेची प्रगती व गुणवत्ता पाहून शाळेला बाला उपक्रम साठी दिले दहा हजार रुपयांचे रोख बक्षिस :

भुसावळ – भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेची प्रगती व गुणवत्ता पाहून मुक्ताईनगर येथील सेवानिवृत्त पोस्ट मास्टर युनूस खान मोहम्मद खान यांचा जि प उर्दू शाळेच्या प्रगतीसाठी पुढाकार घेऊन सोमवार दि. १८ रोजी शाळेला बाला उपक्रम साठी दहा हजार रुपयांचे रोख बक्षिस दिले. सेवानिवृत्त पोस्ट मास्टर युनूस खान मोहम्मद खान यांनी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख झाकीर निसार यांच्या कडे रोख दहा हजार रुपये दिले. यावेळी इमरान शेख, मुख्याध्यापिका रुबिना परवीन, शिक्षक रिजवान खान अजमल खान, सदस्य अब्दुल मिया, अख्तर शेख, हमीद शेख उपस्थित होते

सेवानिवृत्त पोस्ट मास्टर युनूस खान मोहम्मद खान हे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रुबिना परवीन खालिद खान यांचे ते सासरे आहेत. शाळेच्या प्रगती साठी लोकसहभागाची गरज आहे व ती घरापासून करावी त्यासाठी मुख्याध्यापिकेने त्यांच्या सेवानिवृत्त सासऱ्यांना याचे महत्त्व पटवून दिले व मदत मिळवली.

उर्दू शाळेचे प्रगती :

येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेची मुल गेल्या तीन वर्षांपासून तालुका स्तरावरील वकृत्व स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावत आहेत. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना इंग्रजी लिहता वाचता येते. तसेच शाळेत चर्चा सत्रात सहभागी होतात. २०१८ मध्ये शाळा चौथीपर्यंत होती व शाळेची पट फक्त ८ होती. आज शाळेत ७वी पर्यंत वर्ग असून शाळेची पट येथील शिक्षकांनी ३३ पर्यंत पोहचवली आहे. यासाठी गावाशेजारी चोरवड गावात उर्दू शाळा नसल्याने येथील ५ विद्यार्थ्यांना हे शिक्षक शाळेत आणतात. शाळेत संगणक नव्हते. त्यासाठी पुढाकार घेऊन पंचायत समिती कळून दोन संगणक घेतले व मुलाना संगणक शिकविणे सुरू केले आहे.

बाला उपक्रमाअंतर्गत ४० मुद्दे आहेत त्या मधुन जवळ पास २५ मुद्दे पूर्ण झाले आहे. या उपक्रम बाबत तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, उर्दू केंद्र प्रमुख अश्फाक सर यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका श्रीमती रुबिना परवीन खालिद खान यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून शाळेची प्रगती साधत आहे. बाला उपक्रमातील उरलेल्या मुद्यांना मिळालेल्या पैश्यांचा उपयोग करून पूर्ण करू.- रिजवान खान, उपशिक्षक जि प उर्दू शाळा कुऱ्हे पानाचे

काय आहे बाला उपक्रम:

बाला उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेत एकूण ४० बाबी आहेत. त्यात बांधकामाशी संबंधित २० बाबी हाती घेण्यात आल्या आहेत. त्यामध्ये शाळेच्या परिसरामध्ये असलेल्या झाडाभोवती कठडे बांधणे, पायऱ्याऐवजी रॅम्पचे बांधकाम करणे, उघड्या जागेत सौर घड्याळ उभे करणे, अँपीथिएटर तयार करणे, बायोगॅस प्रकल्प सुरू करणे, ओला-सुका कचऱ्यातून गांडूळ खत निर्मिती करणे, भिती आणि बांधकाम केलेल्या ठिकाणी अक्षरे, चिन्हे, अंक कोरणे, रिकाम्या जागेत मुलं बसून शिक्षणात रमून जातील असे चित्र काढणे, दिशादर्शक आणि अंतर दर्शवणारे दगड लावणे या बाबी करायच्या आहेत. यातून लहान मुलांना लहानपणापासून सहज शिक्षण मिळावे आणि त्यात त्यांचा सहभाग हा उद्देश आहे.

या उपक्रमामधला रंगरंगोटी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. यात १० मुद्दे आहेत.

यात मुलांच्या उंचीनुसार फलक बनवणे, रंगवणे, संख्यांचे रंगचक्र, व्हरांड्यातील रंगीत बैठक व्यवस्था तयार करणे, वजन मापक, उंची मापक अशी चित्रे काढणे आणि ती रंगवणे, कोनमापक, नकाशा काढणे या बाबी प्राध्यान्यक्रमाने घेण्यात आल्या आहेत.

शाळेचा परिसरही विकसित करण्याची जबाबदारी या उपक्रमामध्ये पार पाडली जात आहे.यात १० मुद्दे आहेत त्यात सावली देणारी झाडे लावणे, सांडपाण्यातून छोटी बाग तयार करणे, पत्रपेटी, सूर्यमाला तयार करणे, पक्ष्यांसाठी झाडावर पाणी पाण्याची सोय करणे, पाऊस पडल्यानंतर पाण्याला प्रवाह तयार करून देणे आणि शाळेचा परिसर स्वच्छ आणि सुंदर करणे यासाठी लक्ष दिले गेले आहे. यातून विद्यार्थ्यांना दररोज प्रत्यक्ष सहभाग महत्त्वाचा आहे.