नाहाटा महाविद्यालयात कै. ग.वि.अभ्यंकर नाट्यगीत आणि भावगीत स्पर्धा उत्साहात संपन्न :

    भुसावळ - येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालय कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. ग.वि.अभ्यंकर नाट्यगीत आणि शांताबाई अभ्यंकर भावगीत स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यावेळी उद्घाटन समारंभास अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डाॅ.एन.ई.भंगाळे होते.व्यासपीठावर उपप्राचार्य डाॅ.ए.डी.गोस्वामी, विद्यार्थी विकास अधिकारी डाॅ.किरण वारके, मा.श्री. राजेश पुराणिक, सौ.मृणाल गाडगीळ उपस्थित होते.उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक डाॅ.किरण वारके यांनी केले. स्पर्धकांना मार्गदर्शन करतांना डाॅ.ए.डी.गोस्वामी म्हणाले की, महाविद्यालयातर्फे विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. स्पर्धेत कोणालातरी बक्षीस मिळणारच परंतु ज्यांना बक्षीस मिळणार नाही, त्यांनी नाउमेद न होता विश्वासाने पुढील स्पर्धेला सामोरे जावे.आपल्या अध्यक्षीय मनोगतात डाॅ.एन.ई.भंगाळे यांनी असे प्रतिपादन केले की, संगीत कलेने मनुष्याच्या जीवनजाणिवा प्रबळ होतात.अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो.महाविद्यालयीन शिक्षणात संगीत विषयाचा समावेश होणे ही काळाची गरज आहे.यावेळी मातीच्या मुर्ती बनविणारे मुर्तीकार श्री. काशिनाथ रामदास कनोजे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. स्पर्धेचे परिक्षक म्हणून जबाबदारी श्री. राजेश पुराणिक, सौ.मृणाल गाडगीळ यांनी यशस्वीपणे पार पाडली. स्पर्धकांना साथ संगत हर्मोनिअम श्री.जितेश मराठे व श्री. महेंद्र सुर्यवंशी यांनी तबला साथ दिली. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. वैष्णवी बाविस्कर हिने तर आभार कु.वैष्णवी पाटील हिने मानले.
    स्पर्धेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु.कल्याणी पराळे हिने केले.या स्पर्धेत विद्यापीठ परीक्षेत्रातील विविध महाविद्यालयातील  विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध रागातील नाट्य बंदिशी सादर केल्या. 
  समारोप सत्राच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डाॅ. एस.व्ही.पाटील यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात डाॅ.एस.व्ही.पाटील म्हणाले की, नाट्यगीत व भावगीत स्पर्धेद्वारा गायक व गायिका तयार होतात. भारतीय संगीत विश्वात महाविद्यालयीन जीवनापासून सुरूवात होते. श्री.राजेश पुराणिक यांनी स्पर्धेबाबत मनोगत व्यक्त केले. स्पर्धेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. भावगीत प्रथम क्रमांक स्वरमयी मिलिंद देशमुख या विद्यार्थिनीने पटकविला तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देवांगी मिलिंद मोकाशी या विद्यार्थिनीने पटकविले. नाट्यगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक भोई रितेश कैलास या विद्यार्थ्याने पटकविला तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक --वाघमारे खुशी प्रदिप या विद्यार्थिनीने पटकविले. समारोप समारंभाचे आभार प्रदर्शन प्रा.राजश्री देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन कु. वैष्णवी बाविस्कर यांनी केले.या स्पर्धेसाठी प्राचार्य डाॅ.एम.व्ही.वायकोळे, उपप्राचार्य डाॅ.एस.व्ही. पाटील, डाॅ. बी.एच.ब-हाटे, डाॅ.ए.डी.गोस्वामी, डाॅ. एन.ई.भंगाळे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डाॅ.जे.एफ.पाटील,

डाॅ.विद्या पाटील, डाॅ.पी.एच.इंगोले प्रा.पी.पी.महाजन यांनी परीश्रम घेतले. या स्पर्धेला बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.