शिवाजी नगर भागातील मैत्री सागर बौद्ध विहाराभोवतालच्या रस्त्यांचे काम करावे – परिसरातील नागरिकांचे मुख्याधिकारी यांना निवेदन :


भुसावळ – शहरातील शिवाजी नगर भागातील मैत्री सागर बौद्ध विहाराच्या प्रांगणासह सभोवतालच्या रस्त्यांचे १४ एप्रिलच्या आत सुशोभीकरण करावे मैत्री सागरबौद्ध विहाराच्या परिसरात सिमेंटचे रस्त्ये किंवा गट्टू लावण्यात यावे , तसेच विजेच्या पोलवर ट्यूब लाईट लावावे अशी मागणी निवेदनात केली असून याबाबत
शुक्रवार रोजी भुसावळ पालिकाचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना निवेदन देण्यात आले
निवेदनात नमूद आहे की, शिवाजी नगर मैत्री सागर
बुद्ध विहार स्थित जागेत डॉ बाबासाहेब अंबेडकर जयंती निमित्त जमिनिवर सीमेंट कांक्रीटचे गट्टू बसविण्यात यावे व विजेच्या पोलवर ट्यूब लाईट लावावे अशी मागणी महिला मुक्ति जिल्हाअध्यक्ष सौ संगीता राजेंद्र भामरे यांचेसह मैत्री सागर बौद्ध विहार परिसरातील नागरिकांनी केली.
यावेळी मुख्याधिकारी संदिप चिद्रवार यांनी
आपल्या निवेदनाची दखल नक्की घेवू सध्या काम बंद आहे नंतर टेंडर काढू या कामाला तीन चार महीने तरी लागतील प्रोसीजर
नुसार काम नक्की होइल अशी ग्वाही मुख्याधिकारी चिदवार यांनी दिली
यावेळी दक्षता समिति सदस्य व महिला मुक्ति जिल्हा
अध्यक्ष सौ संगीता राजेंद्र भामरे , भुसावळ आशा चोथमल
व दीपाली नीळे व प्रमोद नीळे सुरेश , आकाश निकम व विशाल रितेश नितिन वाघ व आकाश
राउत व अभिषेख खरात , विवेक वाघ व गौतम कांबळे , याचेसह शिवाजी नगर भागातील मैत्री सागर बुद्ध विहार परिसरातील महिला युवक व नागरिक उपस्थित होते .