भुसावळ – जागतिक महिला दिन व स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भुसावळ महिला समन्वय समितीकडून आनंदी उत्साही निरोगी राहण्यासाठी म्युझिक थेरपी किती फायदेशीर आहे हे महिलांना पटवून देण्यासाठी मार्गदर्शनपर व्याख्यान ठेवण्यात आले .
रानातला महादेव मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ता प्रा. राजश्री देशमुख यांनी संगीत ऊर्जा आहे ते फक्त मनोरंजन म्हणून उपयोगी कला नाही. तर संगीत शारीरिक-मानसिक आजारांवर उपचार म्हणून उपयोगी आहे. पूर्वी सण समारंभ उत्सव यातून स्त्रिया स्वतः गायच्या वाद्ये वाजवायच्या आणि नाचायच्या त्यामुळे ताण तणाव मुक्त आणि आजारांपासून दूर असायच्या. संगीत हे संजीवनी बुटी आहे मी निसर्गाने आवश्यक हवा पाणी व प्रकाश यांच्याबरोबर फुकट संजीवनआरोग्यासाठी दिले आहे. अति तिथे माती असते डि.जे.आरोग्याला घातक आहे त्यामुळे असाध्य व जीवघेणे आजार होतात म्हणून आपल्या प्रियजणांच्या काळजीपोटी महिलांनी डीजे विरुद्ध आवाज उठवला पाहिजे असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात सांगितले.
तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी सौ मनीषा पाचपोळ यांनी शासनाच्या योजनांची माहिती दिली. ॲड . कल्पना टेमाणी यांनी कोणते कागदपत्रे नोटरी करू शकतात व त्यांचे काय महत्त्व यावर भाष्य केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा महिला समन्वय प्रमुख ॲड जास्वंदी भंडारी ( पाटील) यांनी भूषविले त्यांनी महिलांनी आपल्या उंचावणाऱ्या क्षितीजा सोबत कुटुंबा कडेही लक्ष द्यावे . न्यायालयात काम करत असताना हे जाणवत आहे की आता घटस्फोटाचे प्रमाण पूर्वीपेक्षा अधिक झाले आहे म्हणून महिलांनी कुटुंब व्यवस्था कशी सांभाळली जाईल कडेही लक्ष द्यावे असे मत यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ नेहा यावलकर यांनी तर ऋण निर्देश सौ मंगलाताई सुलाखे यांनी मानले या कार्यक्रमाला हुडको कॉलनी तीन महिलांनी छान प्रतिसाद दिला यावेळी कॉलनीतील ज्येष्ठ महिलांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ सुनिता अनिल राणे मनिषा भंडारे ,संध्या चौधरी ,प्राजक्ता गंधे, अनिता राणे ,वैशाली चौधरी, अनिता राणे वैशाली हिरे ,रेखा धुपे मनीषा बर्हाटे, ॲड निलेश भंडारी श्री अतुल गुरव व अन्य रहिवासी यांनी सहकार्य केले



