प्रत्यक्ष शिकणे शिकवणे यामुळे अध्यापन क्रिया सुलभ होते- सी एस अवतारे

वरणगाव- एकविसावे शतक हे संगणकाचे आहे व आपल्या देखील या तंत्रज्ञानाच्या युगात इतरांसोबत चालावे लागणार आहे अन्यथा आपण मागे पडू शकतो यासाठी विविध तंत्रज्ञानाचा उपयोग करणे गरजेचे आहे परंतु विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण परिणाम कारक नाही प्रत्यक्षपणे वर्गात शिकण्याची व शिकवण्याची गरज आहे प्रत्यक्ष शिक्षण देत असताना विद्यार्थ्यांच्या संकल्पना समजून घेत यात डिजिटल शिक्षणाचा उपयोग होऊ शकतो पूर्वी काळी विद्यार्थी आश्रमात राहत होते परंतु कालांतराने बदल होऊन विद्यार्थी शिक्षकांकडे शाळेत 5 तास आहे हा काळ अतिशय गरजेचा असून ऑनलाईन शिक्षण हे आभासी आहे विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शाळा सुरू होणे गरजेचे आहे ज्या देशाची शिक्षण पद्धती चांगली तो देश नक्कीच पुढे जातो यामुळे शासनाने देखील शिक्षणावर ती लक्ष देणे गरजेचे असल्याचे महत्त्व असल्याचे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात श्रीनाथ एज्युकेशन सोसायटीचे माजी संचालक तथा माजी प्राचार्य सी एस अवतारे यांनी गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक विद्यालयात आयोजित डिजिटल कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी केले

रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली च्या वतीने शिक्षकांना व्हिडिओ निर्मिती व गुगल फॉर्म यासह इतर माहिती चे प्रशिक्षण देण्याचे तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी श्रीनाथ एज्युकेशन सोसायटीचे संस्थेचे संचालक सीएस अवतारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅली चे माजी सहाय्यक प्रातपाल महेंद्र मेंडकी सेक्रेटरी जीवन महाजन ट्रेझरर सुनील वानखेडे सदस्य राजेंद्र परसे मुख्याध्यापक बी ए पाटील पर्यवेक्षक व्ही वाय चौधरी आदी उपस्थित होते

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जीवन महाजन यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून सुरू असलेले विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती सांगत जिथे गरज तिथे रोटरी असा उपक्रम असल्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे

पहिल्या दिवशी योगेश इंगळे यांनी गुगल फॉर्म कसा तयार करायचा व त्यावरील माहिती माहिती सांगत नीलिमा पाटील यांनी व्हिडीओ निर्मिती करतांना आवाजाचा इफेक्ट व मिक्सिंग कशी करावी याबाबतची माहिती दिली दुसऱ्या दिवशी जीवन महाजन यांनी शैक्षणिक व्हिडिओ तयार करताना कोण कोणती काळजी घेतली पाहिजे तसेच झूम व गूगल मीट विषयी माहिती सांगितली तसेच ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ अपलोड करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत प्रात्यक्षिक करून दाखवले तिसर्‍या दिवशी हायटेक कॉम्प्युटर चे संचालक राजेंद्र परसे यांनी गुगल फॉर्म तयार केल्यानंतर एक्सपोर्ट व पीडीएफ कशी तयार करावी विद्यार्थ्यांनी सोडवलेले उत्तरपत्रिका व त्यावरील अनालीसिस कसे करावे याबाबतची माहिती सांगितले

कार्यक्रमात धर्मेंद्र मेंडकी बोलताना म्हणाले की रोटरीच्या माध्यमातून टीच कार्यक्रम राबवला जातो कोरोना किती दिवस राहील व शाळा किती दिवस बंद असतील हे सांगता येत नाही पण थांबून चालणार नाही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी डिजिटल शिक्षणाची मदत घेणे गरजेचे आहे

मुकेश अग्रवाल म्हणाले की गावाकडून अनेक मुले शिक्षणासाठी शहराकडे गेली परंतु आता प्रवाह उलट झाला असून शहराकडून मुले पुन्हा गावाकडे येत आहे याचे मुख्य कारण म्हणजे कोरणाची आलेली लाट यामुळे अनेकांचे व्यवसाय व नोकरी गेली यामुळे आर्थिक टंचाईला पालक सामोरे जात असल्यामुळे पुन्हा माघारी परतण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे यामुळे विद्यार्थ्यांना सक्षम करण्याची व त्यांची भूक भागविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असून कोरोना मुळे शाळा बंद आहेत परंतु डिजिटल माध्यमाचा वापर करून शिक्षण सुरू आहे याकरता शिक्षकांनी देखील संगणकीय ज्ञान अंगीकारण्याची गरज

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार एम आर चौधरी सर यांनी केले तर कार्यक्रम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले