स्वामी विवेकानंदांचे विचार तरुणांसाठी स्फूर्तिदायी, राष्ट्रमाता जिजाऊंच्या संस्कारांमुळेच घडले छत्रपती शिवाजी महाराज!


भुसावळ – अवघ्या विश्वाला आपल्या अमोघ वक्तृत्वाने जिंकून घेणारे, स्वामी विवेकानंद यांचे विचार तरुणांसाठी स्फूर्तीदायी असून, त्यांच्या विचारांच अनुसरण केल्यास उद्याचा सशक्त भारत घडेल. राष्ट्रमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना बालपणी संस्कार दिले. त्यामुळेच राजे छत्रपती शिवाजी महाराज घडले त्याने स्वराज्य स्थापन केले त्याचे रूपांतर सुराज्यात केले. असे प्रतिपादन उपप्राचार्य उत्तम सुरवाडे यांनी केले
भुसावळ, कला ,विज्ञान आणि पु.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात एन.एस.एस अधिक 2 तर यांनी आयोजित केलेल्या स्वामी विवेकानंद , आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रम प्रसंगी पर्यवेक्षक श्रीमती शोभा तळेले, समन्वयक प्रा टी.एस सावंत, समन्वयक प्रा आर एम खेडकर, समन्वयक स्वाती पाटील, समन्वयक प्रा . एन. एम एस एस कार्यक्रम अधिकारी डॉ. भाग्यश्री भंगाळे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा एम एच सरोदे, प्रा. जे.डी धांडे, प्रा आर.पी मसाने, प्रा एल. पी टाक. प्रा व्हि.डि.सावकारे., प्रा. एच. बी राजपूत. शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन डॉ.भाग्यश्री भंगाळे यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन महा विद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहन भाऊ फालक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन कर्मचारी वृंद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.