सक्षमनारी फाउंडेशनने केला मजुरांच्या छोट्या मुलांबरोबर नाताळचा सण साजरा : भेटवस्तू व केक कापून मुलांना दिला आनंद :


भुसावळ – सक्षमनारी फाउंडेशन तर्फे बांधकाम मजुरांच्या छोट्या मुलांबरोबर नाताळचा सण साजरा करण्यात आला
अनवाणी आणि कडाकयाचे थंडीत कुकुडणाऱ्या या मुलांना याप्रसंगी भेटवस्तू म्हणून चप्पल तसेच स्वेटर देण्यात आले . तसेच चित्रकलेच्या वह्या आणि रंगीत खडूही देण्यात आले . संताबाबाच्या टोप्या घालून आणि केक कापून मुलांचा आनंद द्विगुणित करण्यात आला .नाताळ सणानिमित्त अचानक सांताक्लॉजने येवून दिलेल्या खेळणी व खाऊमुळे मुले भारावून गेली . या प्रसंगी या मुलांसाठी शाळा घेणाऱ्या समाजसेविका शैला सावंत यांची मोलाची मदत झाली .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सक्षम नारी फाउंडेशनच्या डॉ सुवर्णा गाडेकर (सोनार ), पल्लवी अंबाडे , संघमित्रा ढाकणे , वंदना हंस , सुनीता जोशी , सुनंदा डांगे , संगीता जगताप , गायत्री विसपुते , योगिता , सुयश आणि परी यांनी परिश्रम घेतले .