भुसावळ प्रतिनिधि – भुसावल कला विज्ञान आणि पु. ओ . नाहाटा महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग आणि नियोजन अभ्यास मंडल यांच्या संयुक्त विदमाने राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपप्राचार्य व सामाजिक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ए. डी .गोस्वामी होते . कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा एस. टी . धुम तसेच भुसावळ परिसरातील प्रगतिशील शेतकरी अनिल महाजन ( खडका ) उमाकांत भारंबे ( साकरी ) लखन पाटील ( किन्ही ) शाम पाटील ( पारोळा ) आदी शेतकऱ्यांचे प्रतिनिधि म्हणुन उपस्थित होते .

प्रा. एस. टी. धुम म्हणाले भारतीय शेती क्षेत्रातील परिणाम व आव्हाने या विषय त्यांनी उपस्थितीना मार्गदर्शन करतांना सांगीतले की ए. ओ . ए ची निर्मिती कशी झाली त्यातील तरतुदी ग्रीनबॉक्स, ब्लू बॉक्स, अंबर बॉक्स , इत्यादि विषय माहिती दिली . भारतीय अर्थव्यवस्था अनुकूल परिणा मापेक्षा प्रतिकूल परिणाम जास्त झाले आहे. त्यामुळे भारतीय शेतकरी यांची आर्थिक परिस्थिति हालाकी ची होत आहे .नैसर्गिक आपत्ती, बाजारपेठातील शेती भावातील चढ -उतार या समस्यान बरोबर भारतीय शेतकऱ्यांना आर्थिक समस्या भेडसावत आहेत . देशांतर्गत पातळी वरील उपाययोजना करुन जागतीक पातळी वर विचार निनिमय करून शेतकर्याचे प्रश्न सोडवावे . अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली . अनिल महाजन (खडका ) यानी मार्गदर्शन करतांना म्हणाले आमच्या परिवारात माझे वडील व मी शेती व्यवसाय करती आहे .मात्र आताची पिढी ही शेती करेल च याची शाश्वती नाही .याला जबाबदार आपली पध्दत आहे . त्यात बदल होणे अपेक्षित आहे .अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली . उमाकांत भारंबे ( साकरी ) यानी अपने मनोगत व्यक्त केले त्यात ते म्हणाले शासनाचा आणि कृषि अधिकारी यांच्या सल्याने सेंद्रिय शेतीचा प्रयोग झाला .मात्र सदर शेतीसाठी खर्च अधिक असल्याने ग्राहकांनी याकडे पाठ फिरविली . त्यामुळे आर्थिक झळ शेतकऱ्यांना पोहचली . सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय शेती मध्ये अमुलाग्रबदल करून सामान्य ग्राहकांन मध्ये जनजागृती करणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगीतले . अध्यक्षक्षीय भाषणात उपप्राचार्य डॉ. ए.डी.गोस्वामी म्हणाले की अर्थशास्त्र चे इजेकाईल कोळ्याचा सिद्धांत उल्लेख करीत भारतीय शेतकरी देखील या चक्रव्युव हात सापडलेला आहे . या चक्रव्हवतून शेतकऱ्यांना बाहेर काढणे गरजेचे आहे . ताप्ती एज्युकेशन सोसाइटी चे अध्यक्ष डॉ मोहनभाऊ फालक , प्राचार्य डॉ.सौ . एम . व्ही. वायकोळे आपल्या कार्याच्या व्यस्ततेमुळे कार्यक्रमात सहभागी होवू शकले नाही परंतु त्यांनी राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित कार्यक्रम व शेतकारी बांधवाना शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. ललीत तायडे यांनी केले . उपप्राचार्य डॉ . एस. व्ही.पाटील, डॉ . बी . एच . ब -हाटे , डॉ. एन. ई . भंगाळे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रा व्ही. ए . सोळुखे, डॉ . किरण वारके, प्रा जे.पी . आडोकार, प्रा. शितल सोनवणे, यांनी परिश्रम घेतले . मराठी विभाग प्रमुख डॉ .के . के . अहिरे ,डॉ . जे . एफ. पाटिल, इंग्रजी विभागातील प्रा. डॉ . स्मिता चौधरी, हिंदी विभाग प्रमुख डॉ.मनोज पाटिल. इतिहास विभाग प्रमुख डॉ . पी . एच . इंगोले , डॉ . एन . एन . झोपे,डॉ राजेंद्र तायडे, यासह प्राध्यापक प्राध्यापिका विद्यार्थी उपस्थित होते


