जालना : अंबड तालुक्यातील वडीगोद्री व भांबेरी येथील 31 जणांना भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याने नागरीकांमध्ये खळबळ उडाली. अंतरवाली सराटी येथील एकाच कुटुंबातील सात जणांना उपवासाची भगर खाल्याने विषबाधा झाल्याची घटना ताजी असताना शनिवार, 9 रोजी वडीगोद्री व भांबेरी येथील 31 जणांना भगर खाल्याने विषबाधा झाली. यात वडीगोद्री येथील 10 ते 15 ग्रामस्थ तर भांबेरी येथील 16 ग्रामस्थांसह महिलांचा समावेश आहे. बाधीत रुग्णांवर तीन खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दोन वडीगोद्री येथील हॉस्पिटलमध्ये तर एक पैठण तालुक्यातील विहमांडवा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

भगर खाल्ल्यानंतर विषबाधा
सध्या नवरात्रोत्सवामुळे भाविकांचे उपचार सुरू आहेत. त्यातच शुक्रवारी सायंकाळी वडीगोद्री येथील दोन-तीन रुग्णांना उलटी, मळमळ व चक्कर येणे हा प्रकार होऊ लागला. त्यांनी समर्थ हॉस्पिटल वडीगोद्रीमध्ये उपचार घेतले त्याच दिवशी मध्यरात्री पुन्हा उलटी, मळमळ व चक्कर येण्याचे रुग्ण वाढतच गेले. 9 ऑक्टोबरच्या पहाटे तीन वाजेपर्यंत सुमारे 15 रुग्णांना असा त्रास झाला. विशेष म्हणजे सर्वांना भगर खाल्ल्यानंतर विषबाधा झाली.
यांच्यावर रुग्णालयात उपचार
ज्ञानेश्वर बबनराव भवर (33), पुष्पाबाई जालिंदर भवर (60), सुनिता किशोर काळे (40), मंदा हरीभाऊ काळे (65), शिवकन्या सुनिल काळे (35), लक्ष्मीबाई नामदेव शेळके (65), संकेत सुनील काळे (12), सुमित्रा राधाकृष्ण काळे, राजेंद्र रघुनाथ राठोड (32), जनाबाई रामेश्वर गावडे (40), बाबुराव लिपणे (30), राणूजी कोरटकर (58), कोमल सुनील खटके (28) तर भांबेरी येथील, सुरेश उत्तम केजभट, संगीता राजेंद्र कनके, नंदा राजेंद्र कनके, मिराबाई सुभाष खरात, रेखा तुळशीराम कनके, उषाबाई संजय कनके, गयाबाई विष्णू कनके, सुबीदर रावसाहेब कनके, सीताबाई राम करमाळे, कमलबाई गोरख साळुंके , राधाकिशन सुर्यभान कनके, सीताराम राम कनके, सुर्यभान जगान्नाथ कनके, जनाबाई कनके, मंगलबाई कनके, आदी रुग्णांना भगरीतून विषबाधा झाली. विहामांडवा येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अन्य जणांना विषबाधा झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.



