भुसावळ : भुसावळातील सर्वच वर्दळीच्या रस्त्यांची वाताहत झाली असून साधे पायी चालणे देखील कठीण झाल्याने खड्डेमय रस्त्यांची तातडीने पालिका प्रशासन व सत्ताधारी नगराध्यक्षांनी डांबरीकरण अथवा काँक्रिटीकरण करावे अन्यथा बांगड्या भराव्यात, असा इशारा देत संविधान आर्मीचे संस्थापक जगन सोनवणे यांच्या प्रमुख नेतृत्वात सोमवारी दुपारी शहरातील खड्ड्यांना बांगड्या वाहण्यात आल्या.
सोनवणे यांच्या या अनोख्या आंदोलनाची शहरात चांगलीच चर्चा रंगली . तसेच
शहरातील आजी-माजी आमदारांमुळे भुसावळ शहराचा विकास खुंटल्याचा आरोप याप्रसंगी जगन सोनवणे यांनी केला. शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेला नगराध्यक्ष रमण भोळे हेच जबाबदार असून विकासकामे करण्यात ते अपयशी ठरल्याने त्यांनी पदाचा तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी सोनवणे यांनी केली.
यावेळीमागण्यांबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या आंदोलनात पीआरपी जळगाव जिल्हाप्रमुख पुष्पा जगन सोनवणे, संविधान आर्मी प्रदेशाध्यक्ष राकेश बग्गन यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



