भुसावळ – येणारा नवरात्रोंत्सव शांततेत साजरा व्हावा, याशिवाय शहरासह व भुसावळ उपविभागा मध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने उपविभागातील चारही पोलीस स्टेशन कडून सक्त प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यानुसार रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर वेगवेगळ्या प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. चारही पोलीस स्टेशन हद्दीतील टॉप 30 गुन्हेगारांवर,त्याप्रमाणे महिलांविषयक गुन्ह्यांमधील गुन्हेगारांवर, शस्त्र अधिनियमखालील गुन्हेगारांवर, अवैध दारू विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर वेगवेगळी कारवाई करण्यात येणार आहे
त्याशिवाय अशा रेकॉर्डवरील 68 गुन्हेगारांना नवरात्र उत्सवाचे 11 दिवस,सीआरपीसी 144 (3) खाली दिनांक 7/10/ 2021 ते दिनांक 17/10/ 2021 पर्यंत भुसावळ शहर व भुसावळ तालुक्यात प्रवेश बंदीचे प्रस्ताव संबंधित पोलीस स्टेशन कडून उपविभागीय (प्रांत) कार्यालयात सादर केले आहे.
यामध्ये पोलीस स्टेशन निहाय भुसावळ शहर -21,बाजारपेठ – 20 , तालुका – 11, नशिराबाद – 16. गुन्हेगारांवर प्रस्ताव सादर केले असल्याची माहीती उपविभागीय पोलिस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली .



