भुसावळ – दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून पर्यावरणाचा -हास होत आहे , अश्या परिस्थितीत वृक्षरोपणा बरोबरच वृक्ष संवर्धनाची अत्यंत आवश्यकता असल्याची जाणीव प्रकर्षाने होत आहे यासाठी वृक्ष रोपणासह वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकांनी याची दखल घ्यावी व वृक्षसंवर्धनाकरीता झाडे लावावी असे आवाहन भुसावळ उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने यांनी केले .

येथील भुसावळ शहर पत्रकार संस्था आणि निसर्ग पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ नाना पाटिल यांच्या तर्फे नाना पाटील सर यांच्या आई वैजंताबाई शंकर पाटील यांच्या व्दितिय पुण्यस्मरण निमित्त 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रविवारी प्रांताधिकारी कार्यालय आवारात सकाळी 10 वाजता 15 रोपांचे ट्रीगार्ड सह वृक्षारोपण करण्यात आले .
याकार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी रामसिंग सुलाने , डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे , मुख्याधिकारी संदीप चिंद्रवार, तहसीलदार दीपक ढिवरे, आदी मान्यवर उपस्थितीत होते.
प्रसंगी गुळवेल, सिसम , यासह विविध रोपांचे रोपण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले .
यावेळी शहर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा पत्रकार श्रीकांत जोशी ,शहर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा पत्रकार संजय सिंग चव्हाण , पत्रकार संघ अध्यक्ष प्रेम परदेशी, सचिव हबीब चव्हाण, पत्रकार उज्वला बागुल, राकेश कोल्हे , प्रदीप पाटिल , राजेश तायडे , कलीम पायलट,कमलेश चौधरीं , संतोष शेलोडे, सुनील आराक, गोपी म्यांद्रे, सतिष कांबळे, विनोद गोरधे ,सद्दाम खाटीक, अखिलेश धिमान ,मनीषा शिरतुरे , प्रतिभा लोहार , शुभांगी , यांचेसह प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी ,तसेच निसर्ग, सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य समन्वयक नाना शंकर पाटील सर ,महिला पर्यावरण सखी मंच महाराष्ट्र, रघुनाथ आप्पा सोनवणे, रघुनाथ आप्पा सोनवणे ,सुरेंद्र सिंग पाटील ,जी आर ठाकुर (मामा), पर्यावरण प्रेमी, निसर्गप्रेमी, आदी कोरोना प्रतिबंधाबाबतचे नियमांचं पालन करून उपस्थित होते .कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हाध्यक्ष नाना पाटील सर यांनी केली व आभार प्रदर्शन प्रेम परदेसी यांनी केले.


