भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील मानव्यविद्या शाखेतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार संपन्न झाले.
उद्घाटन समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन महेश फालक, प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव मा. विष्णूभाऊ चौधरी तर संस्थेचे कोषाध्यक्ष संजय नाहाटा उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अर्थतज्ज्ञ भालचंद्र मुनगेकर उपस्थित होते. समवेत
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. वायकोळे, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, डॉ. बी. एच, ब-हाटे,
डॉ. ए. डी. गोस्वामी, डॉ. एन. ई. भंगाळे आदि उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वृक्षसंवर्धनाने मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी मा. श्री.महेशभाऊ फालक यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यात त्यांनी बाबासाहेबांचे विचार अनादिकाळ कोणताही भारतीय व्यक्ती विसरू शकत नाही, मानवाला जगण्याचे अधिकार त्यांनी प्राप्त करून दिलेले आहेत. त्यांचे विचार अशा राष्ट्रीय परिषदांमधून
समाजापर्यंत पोहचविण्याचे काम केले जाते ही अभिनंदनीय बाब आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

डॉ. भालचंद्र मुनगेकर यांनी उद्घाटनपर भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जागतिक संदर्भ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी आर्थिक, राजकीय, सामाजिक समानतेवर आधारलेला समाज आंबेडकरांना तयार करावयाचा होता, स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय हे चार तत्व ते मानत, त्यांना कायद्याचे राज्य, संधीची समानता अभिप्रेत होती. राजकीय लोकशाहीला सांस्कृतिक पाया द्यावयाचा होता. भारताला १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. १९५० मध्ये राज्यघटनेचा स्वीकार केला. सुदैवाने नेहरुजींच्या प्रयत्नाने १९५१ पासून पंचवार्षिक योजनांचा स्वीकार केला गेला. देशातील सर्वच समाजाच्या राहणीमानात बदल झाले. औद्योगिक क्रांती झाली परंतु असे जरी असले तरी आजही भारतात बहुतांश लोक गरीबीत जीवन जगत आहेत. कोरोनाच्या काळात २० कोटी लोकसंख्या दारिद्र्यात ढकलली गेली. जातीपातीच्या भिंती उभ्या आहेत. आजही बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले सरकार भारतात नाही ही खेदाची बाब आहे असे त्यांनी नमूद केले. तसेच आपले राज्यसभेतील अनुभव सादर केले त्यात
भारतातील खरा आरसा त्यांनी मांडला व शेवटी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊन जर आपल्या
स्वातंत्र्याची ७५ वी साजरी करावयाची असेल तर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले जात-पात, धर्म,
पंथाच्या पलिकडील सरकार असले पाहिजे असे त्यांनी प्रतिपादन केले.
प्रथम सत्रात डॉ. उत्तम अंभोरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांनी
बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक क्रांती या विषयावर मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी जातीय व्यवस्था, मानवतावाद, मानववंशशास्त्र, बुध्दिवाद, भाषाशास्त्र इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. आंबेडकर इंग्रजी, जर्मनी, पाली, गुजराथी, मराथी इत्यादी भाषांचे गाढे अभ्यासक होते, जगातल्या
अर्थशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ इत्यादींबरोबर ते संवाद साधून होते. देशातील जाती व्यवस्था
कशा पध्दतीने नष्ट करता येईल याचा विचार ते करीत होते. समाज व्यवस्था संपवणाऱ्या ब्राम्हणशाही
आणि भांडवलशाही यावर त्यांनी प्रकाश टाकला. व शेवटी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर Global Context बरोबर Local Context चा उल्लेख केला. त्यात त्यांनी भुसावळ, जळगाव व चाळीसगाव
यांचा संबंध नमुद केला. बाबासाहेबांच्या मते देशातील सर्वांना निवृत्ती वेतन मिळाले पाहिजे असाही उल्लेख त्यांनी केला.
द्वितीय व समारोप सत्रात डॉ. फैज़ अन्सारी, पारूल विद्यापीठ, वडोदरा यांनी बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून मानवी हक्क या विषयावर मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी मुलभूत अधिकार, महिला
अधिकार, समानता, अल्पसंख्याकांचे अधिकार, शैक्षणिक अधिकार, सामाजिक अधिकार, धर्मनिरपेक्षता, गणतंत्र, स्वातंत्र्य, समता इत्यादीबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मानविद्याशाखेतील डॉ. एस. पी, झनके, डॉ, पी. ए. अहिरे,
डॉ. के. के. अहिरे, डॉ. जे. एफ. पाटील, डॉ. स्मिता चौधरी, डॉ. प्रफुल्ल इंगोले, डॉ. किरण वारके, प्रा.
पुरूषोत्तम महाजन, डॉ. मनोज पाटील, डॉ. राजेंद्र तायडे, प्रा, भारती सोनवणे, प्रा प्रशांत पाटील आदिनी परिश्रम घेतले.
तांत्रिक बाबींसाठी संगणक विभागातील प्रा. हर्षल पाटील यांचे सहकार्य लाभले. दिवसभराच्या या राष्ट्रीय
परिषदेत ७०० संशोधक प्राध्यापकांनी नोंदणी केली असून जवळ-जवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
विचारधारांवर २०० प्राध्यापक शोध निबंध तयार करत असून डॉ गिरिश कोळी यांच्या अक्षरा मल्टिडिसीप्लिनरी इंटरनॅशनल जर्नल्स मध्ये प्रकाशित होणार आहेत.


