भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन शाखेच्या वतीने “मुलींना इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन क्षेत्रातून रोजगाराच्या असणार्या संधि” ह्या विषयी परिसंवाद आयोजित केला होता. ह्या दरम्यान बोलतांना प्रा. सुलभा शिंदे यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन ही कोअर ब्रांच असून तंत्रज्ञान किंवा औद्योगिक क्षेत्रात मोठे बदल होत असतांनाही ह्या क्षेत्रातील अभियंत्यांची मागणी स्थिर असते. आजच्या घडीला जर राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय परीपेक्षातून तंत्रज्ञान बदला कडे आपण पहिले तर आपल्याला लक्षात येईल की दैनंदिन वा औद्योगिक वापरातील किंवा उपयोगी वस्तु असो व तंत्रज्ञान असो इलेक्ट्रॉनिक्स शिवाय त्यांचे कार्य पूर्णा होणे अशक्य आहे. माणसा-माणसातील संवादातून सामाजिक क्रांति घडून आली, यंत्रांच्या स्वयमचलनीकरणातून उत्पादन क्षमता वाढली अगदी त्याच मार्गावर पुढे जात असतांना आता घरगुती किंवा औद्योगिक वापरातील यंत्र आणि वस्तु यांच्याशी मानवाचा संवाद किंवा ह्या वस्तु आणि यंत्रांचा एकमेकांशी संवाद अर्थात कम्युनिकेशन इंजीनीरिंग च्या उत्क्रांतीच्या उंबरठ्यावर आपण आहोत. इंटरनेट ऑफ थिंग्ज, मशीन लर्निंग, डिपलर्निंग, आर्टिफिश्यल इंटेलिजेंस, एम्बेडेड सिस्टम्स, ऑटोमोटीव इलेक्ट्रॉनिक्स ही इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन ची उपांगे मोठ्या प्रमाणावर चलनात असून, सुंदर करियर घडवण्याची क्षमता ह्यात आहे. अभ्यासक्रमात असलेल्या लवचिकतेमुळे मुलींना इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलीकॉमच नाही तर आय. टी. क्षेत्रातही गगन भरारी घेता येते. त्यामुळे मुलींनी मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राकडे वळण्याची गरज असल्याचे सांगितले.

प्रा. नीता नेमाडे यांनी कोडिंग, मायक्रोकंट्रोलर, एम्बेडेड सिस्टम, सेन्सर्स ह्यांच्या योग्य अभ्यासातून कुठल्याही उद्योगात मुली करियर करू शकतील. अफाट बलापेक्षा तांत्रिक युक्तयांना आता औद्योगिक क्षेत्रात प्रचंड मागणी असून इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनेंट ह्या तांत्रिक युक्त्या कोडिंग, मायक्रोकंट्रोलर, एम्बेडेड सिस्टम, सेन्सर्स ह्यांच्या माध्यमातून लीलया घडवून आणत प्रचंड मोठ्या तांत्रिक बाबी हाताळत असतात. मोठ्या उद्योगांमधली असेम्ब्ली लाइन असेल, इलेक्ट्रिक वाहन असतील, मोबाइल हँडसेट असेल, संगणक असेल, माऊस असेल, टीव्ही, किंवा अगदी वाहनांमधील सुरक्षा तसेच इंधन नियंत्रण करणारी इलेक्ट्रॉनिक्स फ्युल इंजेक्शन सिस्टम असेल ह्या सगळ्याच ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनेंट शिवाय पर्याय नाही.
परिसंवादा दरम्यान आपले मत मांडतांना प्राचार्य डॉ. आर. पी. सिंह यांनी इलेक्ट्रॉनिक्स चिप्स आणि सेमीकंडक्टर कॉम्पोनेंट तयार करण्याविषयी आज पर्यन्त भारत मोठ्या प्रमाणावर बाहेरील देशांवर अवलंबून होता. मात्र आता जगातला सगळ्यात मोठा इलेक्ट्रॉनिक्स वस्तु आणि सुटे भागांचा निर्माता अशी ओळख बनवण्याच्या दृष्टीने वेगवान धोरणे आखत त्यांची प्रत्यक्ष अमंलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे असे निरीक्षण नोंदवले.
एकूणच इलेक्ट्रॉनिक्स बरोबरीनेच टेलीकम्यूनिकेशन क्षेत्रातही वेगाने बादल घडत आहेत. हे सगळे बदल लक्षात घेता येणार्या वर्षांमध्ये इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राची वाढ वेगात असेल आणि प्रचंड रोजगार संधि ह्यात असतील असा सुर ह्या परिसंवाद दरम्यान मान्यवरांकडून उमटला.
परिसंवादाला प्राचार्य डॉ. आर.पी.सिंह, अधिष्ठाता डॉ. आर.बी.बारजिभे, विभागप्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी, अनंत भिडे, धिरज अग्रवाल, गजानन पाटील ह्यांची सुद्धा उपस्थिती होती.
हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी. अग्रवाल, सचिव एम.डी.शर्मा, कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, सत्यनारायण गोडयाले, रमेश नागराणी यांनी ह्या उपक्रमाचे कोतूक केले आहे.


