भुसावळ – पर्यावरण मंच जायंट्स आणि सखी श्रावणी गृप भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुक्यातील सुसरी येथे टी. बी.पाटील व उपसरपंच रवींद्र पाटील यांच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण प्रेमी राज्य समन्वयक नाना पाटील ,प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ रजनी सावकारे ,सखी श्रावणी गृप अध्यक्ष सौ राजश्री नेवे , जायन्ट्स अध्यक्ष व पर्यावरण उपाध्यक्ष सौ महानंदा पाटील ,पर्यावरण तालुका अध्यक्ष रेखा सोनवणे, सुसरी सरपंच उर्मिला ताई, सदस्य पौर्णिमाताई ,शिवाजी पाटील आदि उपस्थित होते . सूत्रसंचालन राजश्री बादशाह व आभार प्रदर्शन वर्षा लोखंडे यांनी केले .लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी टी.बी.पाटील ,रवींद्र पाटील ,महानंदा पाटील व सुनंदा पाटील यांनी घेतली.

यावेळी महिला मोहिनी राजपूत, विशाखा पाटील, पूर्णिमा म्हसाने ,वंदना रत्नपारखी ,सुनंदा शिरसाट, ललिता चौधरी ,दीपा पाटील, सारिका पाटील ,दिपीका मेश्राम, जया बजाज, दिपाली आहिरे ,मीना राजपूत ,सुनंदा पाटील ,वत्सला पाटील, निर्मला मवाळे , प्रिया सणांचे ,आरती बारवसे ,ज्योती लांडगे ,एकता भगत यांचेसह सर्व गृपच्या महिला पदाधिकारी सदस्या व ग्रामस्थ उपस्थित होते .


