कोल्हापूर –

कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. जोरदार पावसामुळे कोल्हापुरात महापूराची परिस्थिती निर्माण झाली.
दरम्यान याकाळात अनेकांनी स्थलांतरही केले. राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले नसतानाही कोल्हापुरात पूरस्थिती बिकट झाली .
कोल्हापुरातील पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी उद्या (गुरुवार ता. २९) मुख्यमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. परंतू कोल्हापूरला पावसाचा रेड अलर्ट असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा दौरा रद्द झाला आहे.


