देवगिरी कल्याण आश्रमाच्या वतीने प्रांत अधिकारी यांना निवेदन ;

भुसावळ – पश्चिम बंगाल हिंसाचारातील पिडीतांना न्याय व संरक्षण मिळावे या मागणीसाठी देवगिरी कल्याण आश्रम भुसावळ जिल्हयाच्या वतीने निवेदन देण्यात आले . दि.16जुलै रोजी संपूर्ण देशा मधून अ.भा. वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून पं.बंगाल मध्ये निवडणूकीनंतर जो हिंसाचार व अत्याचार झाला व होत आहे यात अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालीत महिला, लहान मुली यांचेवर बलात्कार झालेत आबाळ व्रुध्दांनाही या हिंसेला बळी पडावे लागले याचा सर्वाधिक फटका अनुसूचित जाती जमातीला बसला या घटना 3700 पेक्षा अधिक गावांमध्ये घडल्या आहेत या अनुसूचित समाज व जनजाती समाजावर जो अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळावा यासाठी कल्याण आश्रम त्यांच्या पाठिशी उभा आहे म्हणूनसर्व देशातून एकाच दिवशी हे निवेदन राष्टपती महोदयांना देण्यात आले यात सर्वोच्च न्यायालयाने SIT नेमून चौकशी करावी, पिडीतांच्या वकिलांना संरक्षण मिळावे,ज्यांची घरे नष्ट किंवा क्षतीग्रस्त झालीत त्यांना राज्य सरकारकडून अनुदान देण्यात यावे, म्रुत्युमुखी पडलेल्या परिवारातील एकाला सरकारी नोकरीत घ्यावे, महिला आयोग स्थापन होवून महिलांना लवकर न्याय मिळावा या व अश्या दहा मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.


भुसावळ प्रांत अधिकारी यांना हे निवेदन प्रांताचे उपाध्यक्ष डॉ किशोर मोरे, जिल्हा अध्यक्ष डॉ निलेश भिरूड यांचे मार्गदर्शनाखाली देण्यात आले यावेळी सचिव श्री काशिरा बारेला,सहप्रमुख अँड जास्वंदीभंडारी(पाटील), श्री मधुकर वाणी, अँड. चित्रा आचार्य, श्रीमती सुनंदा खरे, अँड .जयश्री देशमुख श्री विंरसिंग वसावे उपस्थित होते.