कंडारी येथून गुरांची तस्करी ; ६७ हजाराच्या मुद्देमालासह एक ताब्यात – पहाटेच्या सुमारास घडला थरार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ शहर व तालुक्यात गुरांची तस्करी करणारी टोळी सक्रीय झाली असून गेल्या काही दिवसांमध्ये बरीच गुरे पळविल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अश्यातच तालुक्यातील कंडारी येथे दि. १४ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास गुरांची तस्करी करणारी टोळी आली असता, नागरिकांच्या सतर्कतेने चोरीचा डाव उधळून लावला. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी ६७ हजाराच्या मुद्देमालासह एकास ताब्यातला घेतले आहे. तर तीन जण फरार झाले आहेत.
कंडारी येथे पहाटे तीन वाजेच्या सुमारास या टोळीने झायलो कारमध्ये येऊन एका गाईला कोंबून पलायन करण्याचा प्रयत्न केला. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यांनी या कारचा पाठलाग केला. दरम्यान पोलीस पाटील रामा तायडे यांनी पोलिसांना सुचित केले. रात्रीच्या पोलिसांनी लगेचच कंडारीकडे धाव घेतली.
पोलिसांच्या रात्रीच्या गस्ती पथकाने कंडारी गावाकडे धाव घेतली असता कंडारी लागत पोलिसानां संशयितांची झायलो गाडी दिसली. पोलिसांना बघताच स्थायितांनी गाडी रस्त्यात आडवी लावत त्यातील तीन जणांनी पळ काढण्याचाहा प्रयत्न केला. यावेळी सहाय्यक फौजदार संजय कणखरे, साहिल तडवी व इस्माईल खाटीक यांनी त्याचा पाठलागा केला असता एकाला पकडण्यात त्यांना यश आले. तर दोघे फरार झाले. यावेळी झायलो गाडीत बसलेल्या एकाने गाडी पोलिसांच्या दिशेने घेता पोलिसांच्या वाहनाला धडाका देत पसार झाला. याचवेळी त्याने गाडीतून गाय बाहेर फेकत लिम्पस क्लबकडून आयुध निर्माणी कारखान्याकडे पळ काढला. गाडीतून रस्त्यावर फेकून दिल्याने गाय जखमी झाली असून शिंग व पाय मोडले आहेत. या गाईवर डॉ भारत महाजन व गोसेवक रोहित महाले यांचेसह यांनी उपचार केले.
संशयित हा पोलिसांच्या वाहनाला धडक देत आयुध निर्माणीच्या दिशेने जात असताना पोलीस पाठलाग करता होते.
दरम्यान त्याच्या गाडीचे चाक फुटल्याने त्याने रस्त्यात गाडी सोडत अंधाराचा फायदा घेत पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी दोन गायी, एक गोऱ्हा व गाडी असा ६७ हजाराचा मुद्देमला ताब्यात घेत चार जणांवर गुन्हा दाखल केला असून हारून शाह भिकान शाह यास अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीस न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने त्याला २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर फरार तिघं आरोपींचा पोलीस तपास घेत असून यातील दोन जण हे धुळे येथील असल्याचे समजले आहे. त्यानुसार संशयिताच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे.
एखादे मोठे वाहन किंवा टेम्पोचा आवाज होत असल्याने ही टोळी रात्री कार घेऊन गाईची तस्करी करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय कार असल्यास कुणी संशय देखील घेऊ शकत नाही. या भागात अशी सात ते आठ वासरे गेल्या काही दिवसांत पळविण्यात आली आहेत. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पावसामुळे या तस्करांच्या हालचालींचा आवाज जवळ पास राहणाऱ्या लोकांना येत नाही. त्याचाच फायदा ही टोळी उठवित आहे. तालुक्यातील काही भागां मध्येही यापूर्वी गुरे पळविण्याचे प्रकार उघडकीस आले होते. रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांनी संशयास्पद वाहनांची तपासणी केल्यास तस्कारांच्या टोळीला आळा बसणार असल्याचे प्राणी मित्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान , संतोष निसाळकर माजी पं.स. सदस्य , गोरक्षक
रोहीत महाले ,गामा चौधरी, नितिन पाटील ग्रा पं सदस्य, मोहन चौधरी, डॉ भरत महाजन, रामा तायडे पोलीस पाटील सरजू तायडे, ग्रा. पं सदस्य अनिता भालेराव, माजी ग्रा पं सदस्य लक्ष्मण जाधव यांची पहाटे ३ वाजता तिथे उपस्थित होते