एकनाथ खडसेंसह कुटुंबियावर होणारे अन्याय थांबवा , अन्यथा रस्त्यावर उतरणाऱ – सौ नंदा निकम यांचा इशारा ; तहसीलदार यांना निवेदन ;

एकनाथ खडसेंसह कुटुंबियावर होणारे अन्याय थांबवा – अन्यथा रस्त्यावर उतरणाऱ – सौ नंदा निकम ; तहसीलदार यांना निवेदन ;
भुसावळ –
राजकीय षडयंत्रातून ईडी या संस्थेचा वापर करूनएकनाथ खडसे व त्यांचे कुटुंबीयांना नाहक त्रास देण्यात येत असल्याचा निषेध येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्यावतीने तहसिलवर महिलांचा मोर्चा काढ़ण्यात आला असून याबाबत तहसीलदार यांना आज 13 रोजी निवेदन देण्यात आले .
निवेदनात नमूद आहे की ,
गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना विधिमंडळामध्ये व वर्तमानपत्राच्या
माध्यमातून धमक्या देणे सुरू आहे .केंद्रातील सरकारच्या व महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांच्या विरोधात बोलले की, ईडीची धमकी दिली जाते. विनाकारण नाहक त्रास देण्याचा प्रयत्न होतोय. ईडी सारख्या स्वायत्त संस्थेचा वापर राजकीय
स्वरूपात होतोय. ईडी च्या माध्यमातून असे भासवले जात आहे की तुम्ही केंद्र सरकारच्या विरोधात किंवा महाराष्ट्रातील
भाजपच्या नेत्यांच्या विरोधात बोलू नका, भ्रष्टाचारावर बोलू नका, सरळ सरळ असे वाटते की ईडी चा वापर भाजपाच्या
कार्यालयातून होतोय. या प्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करीत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते .एकनाथराव खडसे यांना अशाच प्रकारे नाहक त्रास दिला जातोय,
वास्तविक पाहता भोसरी येथील जमिनीच्या संदर्भात नाथाभाऊ यांनी वारंवार सांगितले आहे की, ही जमीन एम.आय.डी.सी. ची नाही, सरकारची नाही, कोणत्याही प्रकारची भूसंपादनाची प्रक्रिया झालेली नाही. अथवा मूळ
मालकाला जमिनी बाबतचा मोबदला सुद्धा दिलेता नाही ही जागा एमआयडीसीचा ताब्यात नाही त्यामुळे हा व्यवहार
संपूर्णपणे खाजगी स्वरूपाचा आहे .सरकारचे या व्यवहारामुळे काहीही नुकसान झालेले नाही. हा व्यवहार सौ.मंदाकिनी
खडसे व गिरीश चौधरी यांच्या नावाने असून तो अधिकृत आहे. त्यासाठी लागणारी स्टॅम्प ड्युटी सुद्धा रीतसर भरलेली
आहे. एकनाथ खडसे यांचा या व्यवहाराशी कोणताही संबंध नाही त्यांच्या नावाने व्यवहार झालेला नाही, असे असताना जाणीवपूर्वक ईडी कडून त्यांना बोलावण्याचा प्रश्नच काय ? वास्तविक पाहता या प्रकरणाची 2016 पासून पाच
वेळा चौकशी झालेली आहे. न्यायमूर्ती झोटिंग कमेटी, बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे, आयकर विभाग, अँटी करप्शन
ब्युरो (ACB)कडून चौकशी होऊन एसीबी मार्फत क्लोजर रिपोर्ट पुणे कोर्टात सादर करण्यात आलेला आहे. या चौकशीत कोणतेही तथ्य आढळलेले नाही. परंतु एकनाथराव खडसे यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तात्काळ ईडी कडून चौकशी सुरू झाली. यामध्ये राजकीय वास असल्याचे दिसून येते. यापूर्वी अनेक वेळ चौकशी होऊन सुद्धा पुन्हा ईडीची चौकशी होते याचा अर्थ असा निघतो की, राजकीय दबावातून ईडी कार्य करीत आहे.
भाजपच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी का नाही ? असाही प्रश्न उपस्थित केला असून या प्रवृत्तीचा निषेध केला आहे . . खडसे कुटुंबीयांना ज्या पद्धतीने छळले जातेय त्याचा महिला आघाडीतर्फे धिक्कार केला आहे . एकनाथराव खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांना खोट्या भोसरी जमीन प्रकरणात मुद्दाम गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे .महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात एकनाथराव खडसे यांना मानणारा, त्यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे. त्यांची राजकीय व सामाजिक ताकद मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची पायाखालची वाळू
घसरू लागल्याने केंद्रातीत सत्तेचा गैरवापर करून भारतीय जनता पक्षाने एकनाथराव खडसे यांच्या कुटुंबियांवर कुरघोडी करण्याचा केविलवाणा प्रकार सुरू केलेला असून सदर प्रकार तात्काळ थांबवून त्यांचा मानसिक छळ थांबवावा अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशाराही राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी भुसावळच्या शहराध्यक्ष सौ नंदा प्रकाश निकम यानी दिला आहे .यावेळी
महिला आघडीच्या सौ . सीता बाविस्कर यांचेसह प्रकाश निकम यांचेसह पदाधिकारी महिला कार्यकर्ते उपस्थित होते