हतनूर धरणाचे 16 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले ; तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सावधानतेचा इशारा :-

जळगाव (जिमाका) दि. 12 –

हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज सकाळी 7 वाजता धरणाचे सोळा दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. आज दि. 12 जुलै रोजी सकाळी 7 वाजता तापी नदीपात्रात 45803 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहेत.

पुढील 24 तासात पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांचेतर्फे करण्यात आले आहे.