रोहिणी अपघातातील चौघा मयतांची ओळख पटली –
चाळीसगाव —

तालुक्यातील रोहिणी गावाजवळ बुधवार, 30 रोजी सकाळी 11.30 वाजता भरधाव चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला होता. या अपघातातील मयतांची ओळख पटली आहे. कन्नड तालुक्यातील तांदुळवाडी तिघांसह वाघडू, ता.चाळीसगाव येथे एकाचा मयतांमध्ये समावेश आहे. एकाच कुटुंबातील चौघे ठार, तीन जखमी भरधाव चारचाकीन धडकेने झाला अपघात
चाळीसगाव येथून नांदगाव दिशेने चौघे जण दुचाकी (एम.एच. 02 इबी 6476) ने जात असताना रोहिणी गावाजवळील नक्षत्र हॉटेलजवळ भरधाव स्वीफ्टने दुचाकीला धडक दिली. या घडकेत भगवान नागराज पाटील (32, रा.वाघडू, ता.चाळीसगाव), विलास वसंत मोरे (तांदुळवाडी, ता.कन्नड), पत्नी अलकाबाई विलास मोरे व मुलगी रेणूका विलास मोरे (9) यांचा मृत्यू झाला. मुलगा अमोल विलास मोरे (3) हा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे.


