खंडाळा ग्रा.प तत्कालीन सरपंच -ग्रामसेवकाने केला लाखोंचा भ्रष्टाचार ‘राष्ट्रीय दलित पँथर चे चौकशी साठी गट विकास अधिकारी यांना निवेदन’


खंडाळा (वार्ताहर):-

तालुक्यातील खंडाळा ग्राम पंचायत अंतर्गत दलित वस्ती सुधारक कामाची चौकशी व स्वच्छ भारत मिशन तसेच १४व्या वित्त आयोजगाच्या निधीतून केलेल्या कामाची चौकशी करण्यासाठी तक्रारी केल्या असून अद्याप त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली दिसत नाही तरी आज राष्ट्रीय दलित पँथर ने गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे सूचित केले असून आपण आमच्या मागण्या त्वरित विचार करून त्यावर योग्य ती कार्यवाही करावी असे निवेदन राष्ट्रीय दलित पँथर ने गटविकास अधिकारी यांना दिले आहे.
सविस्तर असे की खंडाला ग्रामपंचायत मध्ये सन २०१५/२०२० च्या कालावधीत खंडाळा गावात एकच दलित वस्ती असून त्यात दलित वस्ती सुधारक योजने अंतर्गत सरपंच/ग्रामसेवक यांनी संगनमत करून दोन ते तीन वेळा वेळा एकावर व एक वेळाच क्रांकिट रस्त्याची कामे दाखवली असून अंदाजपत्रक प्रमाणे न करता त्यात लाखों रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करून संबंधितार कायदेशीर कारवाई करावी अशी तक्रार १२/०५/२०२१ रोजी केलेली आहे त्यावर अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही सदरची चौकशी तक्रारदाराला सोबत घेऊन संबंधितांवर कार्यवाही करावी. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तत्कालीन सरपंच/ग्रामसेवक यांनी संगनमत करून बोगस लाभार्थी दाखवून तसेच मयत लोकांच्या नावे तसेच ज्यांना गरज नसतांना ज्यांनी घराचे बांधकाम करतांनाच शौचालय बांधलेले आहे अशा लोकांच्या नावे निधी लटलेला आहे त्यात ही लाखो रुपये हडप केले असून त्याची ही चौकशी साठी २७/०५/२०२१ रोजी तक्रार दिली आहे त्यावर ही अद्याप कार्यवाही केलेली नाही याची पण तक्रारदाराला सोबत घेऊन संबंधितांवर कार्यवाही करावी. १४व्या वित्त आयोगा अंतर्गत खंडाला ग्राम पंचायत मध्ये दुसऱ्या योजनेत केलेली कामे सुद्धा १४व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत दर्शीवली आहे तर काही कामे मर्यादापेक्षा जास्त रकमेची दाखवून लाखो रुपयांचा निधी सरपंच/ग्रामसेवक यांनी संगनमत करून लटलेला आहे १४व्या वित्त आयोगाच्या एकूण निधीतून अनु जाती साठी १५% रक्कम खर्च करावयाची असते ती यांनी पूर्ण खर्च न करता फक्त ४०हजार रुपये खर्च केला असून बाकी रक्कम यांनी परस्पर हडप केली आहे अशी ही तक्रार ९/०६/२०२१ रोजी केली आहे तरी यावर सुद्धा आजपावेतो कोणत्याही प्रकारची चौकशी व कार्यवाही करण्यात आली नसून या तत्कालीन सरपंच/ग्रामसेवकावर हे संबंधित अधिकारी पाठीशी घालत आहे का? का या भ्रष्टाचारी सरपंच /ग्रामसेवकावर प्रशासन मेहरबान होत आहे..? असा प्रश्न उपस्थित होत आहे तरी या सन २०१५/२०२० या कालावधीत झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी यासाठी गटविकास अधिकारी विलास भाटकर यांना राष्ट्रीय दलित पँथरचे महाराष्ट्र सरचिटणीस सिद्धार्थ सोनवणे, जळगाव जिल्हा सरचिटणीस व ग्रा प सदस्य प्रेमचंद सुरवाडे ,जिल्हा सचिव सुभाष जोहरे, तालुका उपाध्यक्ष शरद सुरवाडे यांनी निवेदन दिले आहे.
चौकशीचे अर्ज करताच ग्रामसेवक रजेवर:- खंडाळा ग्रा प मध्ये २०१५/२०२१या कालावधीत सरपंच,उपसरपंच, सदस्य,व ग्रामसेवक यांनी दलित वस्तीत नाही तर सर्वच गावातील योजनेत लाखोंचा भ्रष्टाचार केला असून मागील पाच वर्षे फक्त स्वतःचा खिसा गरम केला असून गावकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक केली आज गेल्या दोन महिन्यांपासून कोणत्याही प्रकारची माहिती चा अर्ज केला तर ग्रामसेवक उडवाउडवीची उत्तर देऊन सुट्टी टाकून घेत आहे यामुळे दुसरा कोणताही ग्रामसेवक हजर होण्यास तयार नाही तरी संबंधित अधिकारी यांनी गांभीर्यपूर्वक विचार करता या सर्व भ्रष्टाचार केलेल्या योजनांची सखोल चौकशी तक्रारदार यांच्या समोर करावी व तत्कालीन सरपंच/ग्रामसेवक यांच्या वर गुन्हे नोंद करावा अन्यथा जिल्हा परिषदेच्या समोर राष्ट्रीय दलित पँथर चे पदाधिकारी आमरण उपोषण करणार असल्याचे जळगाव जिल्हा सरचिटणीस,ग्रा प सदस्य प्रेमचंद सुरवाडे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *