समस्त राजपूत समाजा तर्फे शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांचा सत्कार ;

भुसावळ (प्रतिनिधी) –

सामाजिक विकास संस्था तसेच समस्त राजपूत समाज बहुउद्देशीय सेवा संघाचे उपअध्यक्ष तथा शिवसेनेचे नूतन जिल्हाप्रमुख समाधान धर्मा महाजन सर यांची भुसावळ, चोपडा विधानसभा करीता शिवसेना जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल समस्त राजपूत समाज बहुउद्देशीय सेवा संघ जळगाव (महाराष्ट्र) व मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समाधान महाजन यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . वरणगाव येथे त्याच्या घरी छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून सत्कार करण्यात आला.

समाधान महाजन यांचा राजपूत समाजाला सार्थ अभिमान – अध्यक्ष किशोर महाजन ;

कार्यतत्परतेणे सचोटीने एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे आपल्या पक्षासाठी जे कार्य आहे. त्याची पावती म्हणून पक्षाने आपणास एवढी मोठी जबाबदारी दिली आहे.
सर आपण राजकीय पटलावर कार्य करत असताना सुद्धा आम्हाला सामाजिक कार्यासाठी सदैव मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत असते त्याचा आम्हा सर्व पदाधिकारी व संचालक मंडळाला तसेच समाजाला सार्थ अभिमान आहे
आपण अशीच उत्कर्षाची शिखरे पार करत जावे असे राजपूत समाजाचे अध्यक्ष किशोर वसंत महाजन यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील,यांचा ही पुन्हा जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल समाज्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी किशोर वसंत महाजन अध्यक्ष, कैलास पितांबर पवार कार्याध्यक्ष, प्रविण कौतिक मोरे सचिव, रवींद्र नथु पाटील सहसचिव ,
किरण जनार्दन पवार कार्यकारी संचालक, अशोक पंडीत पाटील सल्लागार तथा उपसभापती:- कृषी उत्पन्न बाजार समिती भुसावळ, गणेश रघुनाथ महाजन सल्लागार, विजय दगडू पाटील संचालक,
सतीश प्रल्हाद पाटील,विकास दयाराम महाजन,वीरेंद्रसिंग विक्रम सिंग पाटील , सुनील रतन महाजन, अॅड.आर के पाटील, बी के पाटील, लालचंद नामदेव पाटील, शंकर माधव पाटील, मोहन देवचंद महाजन,योगेश पाटील,कुमार पाटील, चरणसिंग चौधरी ,रमेश पाटील उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *