भुसावळ (प्रतिनिधी )-
काळाची गरज ओळखून समाजहित लक्षात घेवून समाजहितोपयोगी उपक्रम करावे तसेच पर्यावरण जोपासण्यासाठी वृक्षारोपण करावे असे आवाहन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे जिल्हाध्यक्ष
नाना पाटील सर यांनी केले.
शिवराज्याभिषेक दिन आणि जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील कु-हा पानाचे येथे समाजपयोगी विविध कार्य करून शिवराज्याभिषेक दिन व वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला .
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विधिवत पूजन व अभिवादन करून वृक्षारोपण उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले .
नाना पाटील सर म्हणाले की , ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात रायतेची गरज ओळखून रयतेचे स्वराज्य व्हावे यासाठी कार्य केले आणि स्वराज्य मिळवून दिले. त्यानुसार आज कालानुरूप बदल होत आहे म्हणून आपणही त्या त्या काळाची गरज ओळखून समाजहित लक्षात घेवून समाजहितोपयोगी उपक्रम करावे तसेच पर्यावरण जोपासण्यासाठी वृक्षारोपण करावे .असे आवाहन नाना पाटील सर यांनी केले. तर
यावेळी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जळगाव शहराध्यक्ष पंकज नाले व निसर्ग पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने कु-हा गावात निर्जनंतुकीकरण फवारणी (सॅनटाईज) करण्यात आली. तसेच जागतिक पर्यावरणाच्या दिनानिमित्ताने माध्यमिक शाळेत आणि ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात महिला बचत गट व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ जिल्हा जळगाव, जनमत प्रतिष्ठान माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले. क़ुर्हा पानाचे गावातील लोकांचे , समाजाचे ,विद्यार्थ्यांचे , पोलीस विभागाचे , डॉक्टरांचे आरोग्य लक्षात घेवून येथील माध्यमिक शाळा, पोलीस चौकी, ग्रामीण दवाखाना ,खाजगी दवाखाना , शासकीय कार्यालयाचे सैनीटाईज करण्यात आले .
जागतिक पर्यावरणाच्या दिनानिमित्ताने माध्यमिक शाळेत आणि ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात महिला बचत गट व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ जिल्हा जळगाव, जनमत प्रतिष्ठान माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी कु-हा येथील सरपंच माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश आण्णा शिंदे , रघुनाथ आप्पा सोनवणे, राज्य सल्लागार सूरेंद्र सिंग पाटील ,शाळेचे मुख्याध्यापक डी डी पाटील ,शाळेचे अध्यक्ष आप्पासाहेब बडगुजर , त्याचप्रमाणे समाजसेवक गिरीश पवार आदीं उपस्थित होते.




