२० वर्षीय तरुणीवर पित्यानेच केला अत्याचार : जळगावातील घटना ;


जळगाव –
शहरातील एका भागातील २० वर्षीय तरुणीवर सावत्र बापाने अत्याचार केल्याची गंभीर घटना घडली. आरोपीस पित्यास रामानंद नगर पोलिसांनी अटक केली आहे.
२०१९ पासून अत्याचार
शहरातील एका भागात राहणार्‍या विवाहितेचे दुसरे लग्न झाले असून पहिल्या पतीपासून झालेल्या २० वर्षीय तरुणीवर सावत्र बापाने २०१९ पासून अत्याचार केला. पीडितेने या संदर्भात आजीला (वडिलांची आई) सांगूनही तिने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. पीडित मुलीच्या आईला घडलेल्या प्रकाराबाबत कल्पना आल्याने मुलीला पुण्यात आपल्या आई-वडिलांकडे पाठविले मात्र नराधम सावत्र बाप तरूणीला वारंवार मेसेज पाठवून, कॉल करून पुन्हा जळगावी बोलवत होता. जळगावला न आल्यास पीडित तरुणीच्या आईला व लहान बहिणीला त्याने त्रास देण्यास सुरुवात केली. आपल्या आई बहिणीवर होत असलेल्या अन्यायाला कंटाळून पीडित मुलीने आजी-आजोबांना घडला प्रकार सांगत मदतीची याचना केली. त्यांनी पुण्यातील एका सामाजिक संस्थेच्या मदतीने पुणे पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर तो रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशीरा नराधम पित्यास अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *