फी साठी शैक्षणिक संस्थाकडून तगादा ; विद्यार्थी वेठीस ; कोरोना महामारीत विद्यार्थी झाले भयभीत ;

भुसावळ (प्रतिनिधी )-

संपूर्ण भारत कोरोनो-१९ या महामारीस झुंज देत आहे. सर्वत्र उद्योगधंदे, कंपन्या, व्यवसाय बंद असून रोजगार ठप्प झालेले आहे. संपूर्ण अर्थव्यवस्था हि संक्रमण व्यवस्थेतून जात आहे. अश्यातच शैक्षणिकक्षेत्रा मध्ये
संस्था, शाळा, महाविद्यालय, इंजीनिअरिंग कॉलेज, हे मात्र विद्यार्थ्यांकडे फीच्या मागणीसाठी तगादा लावत आहे.
कोरोनाच्या या काळात सर्वत्र कॉलेज बंद (ऑफ लाईन) आहे. कोणतीही विद्यार्थी, विद्यार्थिनी शाळा कॉलेज
मध्ये जात नाही.
असे असतांना विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना फी मागणी साठी मोबाईलवर वारंवार तसेच अवेळी संपर्क साधत
आहे. वास्तविक पाहता कोरोना-१९ चा वाढता प्रादुर्भावामुळे विद्यार्थी भयभीत झालेले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधारात दिसत आहे. त्यामुळे पालकांची आर्थिक विवंचना पाहून विद्यार्थ्यांना मानसिक ताण निर्माण झाले आहे. संपूर्ण देशामध्ये ४५ कोटी लोकसंखेच्या वर लोक असंघटीत रोजगार असून शेतामध्ये अर्धवेळ काम करीत
आहे. या कोरोना महामारीमध्ये त्यांना स्वतःचा तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होऊन बसले आहे.
या सर्व परिस्थितीचा विचार करून देशाचे पंतप्रधान व सर्व राज्यांचे मुख्यमंत्री यांनी यातून मार्ग काढावा.
व विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा हि मागणी होत आहे. तसेच शैक्षणिक संस्थांकडून फी मागणी साठीचा तगादा होऊ
नये अन्यथा विद्यार्थ्यांची मानसिकता बिघडून त्याचे सामाजिक परिणाम घातक होण्याची श्यक्यता नाकारता येत नसल्याचं अॅड. रमेश पांडव यांनी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *