मुंबई –
राज्यातील करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून येत्या १५ मे पर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे.याचे निर्बंध लागू करतानाच राज्य सरकारने राज्यातील हातावर पोट असणा-या रिक्षा चालकांना १५०० रूपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली आहे.त्यासाठी रिक्षा चालकांनी आपले बॅक खाते आधार क्रमांकाशी लगेच तात्काळ जोडूण घ्या असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.
अडचणीत सापडलेल्या रिक्षा चालकांना राज्य सरकारने दिलासा देत त्यांच्या खात्यात १५०० रूपयांचे अनुदान जमा होण्यासाठी पाऊल उचलले आहे.पाच लाख फेरीवाल्यांसह,बारा लाख रिक्षाचालकांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर आता परिवहन आयुक्त कार्यालयाने महत्वाचे आवाहन रिक्षा चालकांना केले आहे.रिक्षा परवाना धारकांनी आपले बॅक खाते आधार क्रमांकाशी तात्काळ जोडून घेण्याचे आवाहन केले आहे.सानुग्रह अनुदानाची रक्कम रिक्षा चालकांच्या खात्यात वेळेवर जमा होण्यासाठी बॅक खाते आधार क्रमांकाशी तात्काळ जोडून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सदर प्रणाली तयार झाल्यावर संबंधितांच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने रक्कम जमा करण्यासाठी परिवहन विभागाकडून एक प्रणाली विकसित करण्यात येत आहे.सदर प्रणालीची माहिती https://transport.maharashtra.gov.in//1015/Home या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
रिक्षा परवाना धारकांकडे पुढीलप्रमाणे पेपरची छायांकित प्रत आवश्यक आहेत.
१ ) आधारकार्ड बॅंक खात्याशी लिंक
२) लायसन्स / बॅच
३) रिक्षा नंबर
४) बॅंक खाते नंबर
५) रिक्षा परवाना (परमिट)
ॲानलाईन पद्धतिने अर्ज करण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या व सर्व कागदपत्रांसह रितसर नोंदणी करा असे आवाहन विविध रिक्षा संघटनांनी केले आहे.



