ठाकरे सरकारने कोरोना रुग्णाचें मोफत उपचार करावेत ; आंध्र प्रदेश सरकार प्रमाणे निर्णय घ्यावे – शिशिर जावळे यांची मुख्यमंत्री यांना मागणी .

आंध्र

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाने संपूर्ण जगासह महाराष्ट्राला आपल्या विळख्यात अडकवलं आहे. या विषाणूच्या संक्रमणामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत. आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे.अनेकांचे रोजगार बुडालेत. गोर गरीबापासून सर्वच स्तरातील लोकांना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे.एकीकडे लॉकडाऊन तर एकीकडे कोरोना .. अशातच शासकीय व खाजगी कोविड रुग्णालयामध्ये रुग्ण संख्या वाढत आहे. काही ठिकाणी मृत्यू दर वाढत आहे. पैशाअभावी कोविड रुग्णाना आपला जीव गमवावा लागत आहे.अनेक कुटुंबातील कर्ता व्यक्तीचे कोरोना मुळे मृत्यू झाल्याने त्या कुटूंबातील लोकांना उदरनिर्वाह करावा कसा असा यक्ष प्रश्न पडला आहे. राज्यातील बऱ्याच शासकीय कोविड रुग्णालयात रुग्णांसाठी बेड शिल्लक नसल्याने आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा बरेच रुग्णांचे नातेवाईक रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी नाइलाजास्तव कर्ज करून, अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णाना दाखल करीत आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये खर्च न परवडणारा असल्याने सुद्धा आपला covid-19 वाचावा यासाठी पैशांची ओढाताण करून रुग्णांचे नातेवाईक आपल्या रुग्णांचा प्राण वाचवण्यासाठी धडपडत आहेत.कोविड रुग्णाच्या उपचारासाठी सिटी स्कैन, ऑक्सिजन, व्हेनटिलेटर, महागडे इंजेकशन वगैरे साठी हजारो पासून लाखो रुपयांपर्यत खर्च करावा लागत आहे. घर खर्च करावा की आपल्या कोविड रुग्णाचे प्राण वाचवावे असा संभ्रम व चिंता अनेकांसमोर निर्माण झाला आहे.बऱ्याच शासकीय कोविड रुग्णालयात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आवश्यक लस उपलब्ध नसणे, बेड उपलब्ध नसणे या व अनेक कारणास्तव डोईजड असणारे लाखो रुपये लागणाऱ्या काही खाजगी कोविड रुग्णालयात जाण्याशिवाय पर्यायचं नसल्याने शेवटी पैशा अभावी रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. आणि म्हणून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहना रेड्डी यांनी आंध्र प्रदेशातील सर्व खाजगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा जो जनहितार्थ निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर असाच निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सरकारने त्वरित घ्यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कडे केली असल्याचे एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *