भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळात शहरांमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे मृत्यूचे प्रमाणही वाढलेले आहे तरीही नागरिकांना भीती वाटत नाही. राज्य सरकारने ब्रेक द चेन यासंदर्भात काही नियमावली घालून दिली आहे. मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत मुख्य आठवडे बाजारातील भाजीपाला मार्केट व काही किराणा दुकाने उघडी ठेवण्याचे आदेश असतानाही वेळेपेक्षा जास्तवेळ भाजीपाला मार्केट व काही किराणा दुकाने आज २७ रोजी शहरात सुरूचे होती.
पोलिसांना याबाबतीत खबर मिळताच पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात पोलिस पथकाने बाजारात कारवाई करण्यास सुरुवात केली .मात्र
पोलीस दिसताच भाजीपाला विक्रेते व नागरिकांची एकच धावपळ सुरू झाली. त्यामुळे मुख्य आठवडे बाजार व
भाजीपाला मार्केटमध्ये चांगलाच गोंधळ उडाला.

संचारबंदीचे उल्लंघन : 88 केसेस–
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका आणि पोलिस प्रशासनाने शहरात संचारबंदीचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई सत्र सुरू ठेवले आहे.
विना मास्क वावरणार्यांसह लॉकडाऊनचे उल्लंघन करणार्या विरुद्ध 88 केसेस पोलिसांनी करीत दंड वसुल केला तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघण करणार्या 96 केसेस करीत 18 वाहनधारकांकडून दंड वसुल करण्यात आला. नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये तसेच शासनाचे नियमांसह संचारबंदीचे सर्व नियमांचे पालन नागरिकांसह भाजी विक्रेत्यांनीं करावे असे आवाहन पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनीं केले आहे .


