भुसावळात शिवभोजन केंद्राचा गरजूंना मिळतोय लाभ – प्रती दिवशी 125 थाळींचे वाटप : भुसावळ जंक्शन असल्याने थाळी संख्या वाढवण्याची अपेक्षा –


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरात गेल्या 13 महिन्यांपासून शासनातर्फे शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले असून या माध्यमातून गरजूंना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रति दिन 125 लाभार्थींना पाच रुपये प्रति दिन शिवभोजन थाळीचे वाटप सुरू असून आता कोरोनाच्या अनुषंगाने राज्य शासनाने कडक निर्बंध जाहीर केल्याने 15 एप्रिल ते 1 मे दरम्यान प्रति दिन 125 गरजू व लाभार्थींना दाळ, भात, दोन चपाती व एक भाजी असा दररोज मोफत लाभ दिला जाणार आहे मात्र त्यासाठी केवळ फोटोची अट असल्याचे केंद्र संचालक उमाकांत शर्मा यांनी कळविले .
शिवभोजन केंद्राचा गरजूंना
मिळतोय दिलासा –
राज्य शासनाने 14 एप्रिलच्या रात्री 8 वाजेपासून 1 मेपर्यंत संचार बंदीच्या अनुषंगाने कडक निर्बंध लादले आहेत. या परीस्थितीत गरीब जनतेचे हाल होऊ नये याकरिता शिवभोजन मोफत देण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर भुसावळ येथे गरजूंना मोफत शिवभोजन देण्यात येत आहे. शिवभोजन (शिवथाली) शिव प्रतिष्ठान शिवभोजन केंद्राला 125 थाली मंजूर असून दररोज त्याचे वाटप केले जात आहे . केंद्र संचालक उमाकांत शर्मा उर्फ नमा यांनी सांगितले की, जंक्शन शहर असल्याने व प्रवाशांची व गरजूंची गर्दी पाहता असल्याने 125 थाळी कमी पडतात. भुसावळ हे रेल्वेचे जंक्शन असून येथे प्रवाशांची खूप गर्दी असते. यासाठी या ठिकाणी थाळ्यांची संख्या वाढविण्यात यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. किमान प्रति दिवस 200 थाळी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कट्टर शिवसैनिक व केंंद्र संचालक नमा शर्मा यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *