वरणगांव –
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र थैमान घातले असतांना मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे . त्याला वरणगांव सुद्धा अपवाद नाही . दररोज कोरोनाने एक तरी व्यक्ती दगावत आहे . त्या अनुषंघाने प्रशासनाकडून मात्र मागील वर्षानुसार खबरदारीची पावले उचलली जात नसल्याची खंत आहे . शहरात कोरोना पेशंटची वाढती संख्या लक्षात घेता संपूर्ण वरणगांव शहर निर्जंतुकीकरण करण्याची .व सॅनिटायझर फवारण्याची मागणी राष्ट्रवादी युवाचे जिल्हा उपाध्यक्ष वाय .आर. पाटील (सर ) यांनी नगर परिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे .
निवेदनावर राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेन्द्र चौधरी ‘ता . प्रमुख दिपक मराठे ‘ सुधाकर जावळे ,समाधान चौधरी ‘ कैलास माळी , पप्पू जकातदार ‘ इफ्तेकार मिर्झा यांचे सह असंख्य कार्यकर्त्याच्या सह्या आहेत .



