भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील शिवसेना व सार्वजनिक उत्सव समिती तर्फे आज बुधवार 31 मार्च रोजी रयतेचे राजे छञपती शिवाजी महाराज यांची तिथी प्रमाणे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रसंगी आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे विधिवत पूजन करण्यात येवून त्रिवार अभिवादन करण्यात आले .
मागिल वर्षापेक्षा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमिवर वाढत्या संसर्गामुळे राज्यात परिस्थिती खुप गंभीर झालेली आहे त्यामुळे आगदी साध्या पध्दतीने रेल्वे स्थानका नजिक असलेल्या पूर्णाकृती पुतळयाचे पुजन करुन छोटेखानी जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी शासनाच्या त्रिसूत्री नियमांचे काटेकोरपने पालन करण्यात आले .
दरम्यान शिवभोजन केंद्र संचालक शिवभक्त शिवसैनिक उमाकांत शर्मा (नमा ) यांच्या तर्फे व उपस्थित मान्यवरांचे हस्ते गरीबांना अन्नदान करण्यात आले.
यावेळी आमदार संजय सावकारे यांचेसह आयपीएस अधिकारी आर्चित चांडक , नगराध्यक्ष रमण भोळे ,युवराज लोणारी , शिवाजी महाराज सार्वजनिक उत्सव समिती अध्यक्ष निलेश महाजन ,उपाध्यक्ष जाकिर पेंटर ,शिवसेना नगरसेवक, सभापती मुकेश गुंजाळ, राजेंद्र आवटे , गिरीश महाजन , परीक्षित ब-हाटे , किरण कोलते , सतिष सपकाळे , अरुण थोरात , व शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक गौरव शर्मा , मनीष अग्रवाल, धिरज वरढोंनकर, खुशाल जोशी , प्रवीण ईखनकर, बबलू खान , मधुकर परसारे तसेच शिवप्रेमी, शिवभक्त वशिवसैनिक उपस्थित होते .



