भुसावळ स्टेशन येथे फोट्रेस टिकिट चेकिंग ; एकूण 1,26,220/- रूपये दंड वसूल ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाकडून बिना तिकिटे प्रवास करणारे , अनियमित तिकीट यात्रा ,जेष्ठ नागरिक सवलतीचा गैरवापर हे रोखण्यासाठी अनियमित यात्रा करणारे साठी विशेष तिकीट तपासणी मोहीम भुसावळ स्टेशन येथे दिनांक 27.03.2021 ला करण्यात आली.
भुसावळचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार व मंडळ वाणिज्य प्रबंधक बी.अरुण कुमार , सहाय्यक वाणिज्य प्रबंधक(टीजा), मंडळ मुख्य तिकीट निरीक्षक आहुलवलीया आणि विशेष तिकीट तपासणी निरीक्षक वाय डी पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 27.03.2021 रोजी भुसावळ स्टेशन येथे विशेष तिकीट तपासणी मोहीम आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये 16 तिकीट तपासणी कर्मचारी यांनी प्रवाशांकडून एकूण 1,26,220/- रूपये दंड वसूल केला. या मोहिमध्ये बिना तिकीट प्रवास करणारे 195 केसेस मधून 1,26,220/- रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.
प्रवाशांनी योग्य तिकिटासह प्रवास करावा असे आवाहन मध्य रेल्वे भुसावळ मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *