भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील नवीन सातारा भागातील खळवाडी भागात पत्नीकडे का पाहतो म्हणून जाब विचारण्यास गेलेल्या पतीस दोघा भावांनी मारहाण केली व हा वाद सोडवण्यासाठी 28 वर्षीय विवाहिता गेली असता तिचा विनयभंग करण्यात आल्याने दोघांविरुद्ध शहर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 28 रोजी पीडीतेच्या पतीने आरोपी संजय पाटील यांना तुमचा भाऊ पत्नीकडे का पाहतो? याचा जाब विचारल्याचा राग आल्याने दोघा भावांनी फिर्यादीच्या पतीला मारहाण केली व वाद सोडवण्यासाठी विवाहिता गेल्यानंतर आरोपींनी विवाहितेचा विनयभंग केला. या प्रकरणी संजय काशीनाथ पाटील व योगेश काशीनाथ पाटील यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप दुनगहू करीत आहेत.



