आजाराची प्राथमिक माहिती असल्यास अनेकांचे वाचवू शकतात प्राण – डॉ. तौसीफ खान

आजाराची प्राथमिक माहिती असल्यास अनेकांचे वाचवू शकतात प्राण – डॉ. तौसीफ खान
भुसावळ (प्रतिनिधी

दररोजच्या दैनंदिन जीवनात वावरत असताना छोटो मोठे अपघात होत असतात. या अपघाता विषयीची तिव्रता आपणास माहिती असली पाहिजे. त्या अपघाताच्या भितीमुळे रूग्णांचे प्राण देखील गेल्याची उदाहरणे आहेत. घरात प्रथोमपचार पेटी असली पाहिजे. यामुळे किरकोळ होणाऱ्या अपघातावर प्रथोमपचार करून त्या रूग्णाला आपण दवाखान्या पर्यंत पोहचवू शकतो.यासाठी आपणास प्रथमोपचारा बाबतची माहिती सोबतच विविध आजाराची प्राथमिक माहिती असल्यास आपण अनेकांचे प्राण वाचवू शकत असल्याचे प्रतिपादन नगरपालीका वैद्यकीय अधिकारी डॉ. तौसीफ खान यांनी कले.
शिवजयंतीचे अवचित्य साधून आर्या फाऊंडेशन , रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली व अध्ययन पॅरामेडीकल कॉलेज व हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवशीय प्रथमोपचार प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोटरी क्लबचे प्रोजेक्ट सेक्रेटरी संजू भटकर, उषा फाऊंडेशनचे अध्यक्ष जीवन महाजन, ग.स.सोसायटीचे माजी तज्ञ संचालक योगेश इंगळे, प्राथमिक शिक्षक सोसायाटीचे संचालक प्रदिप सोनवणे, जळगाव जिल्हा विज्ञान अध्यपक मंडळाचे सचिव सुनिल वानखेडे, आर्या फाऊंडेशनच्या डॉ.वंदना वाघचौरे, अध्ययनपॅरामेडीकल कॉलेज च्या प्राचार्य प्रा. मनिषा बाविस्कर, आदि उपस्थित होते.

यावेळी बोलता डॉ. खान म्हणाले की, हद्यविकार, सर्पदंश, विंचू दंश, जळालेले व्यक्ती या आजाराविषयी माहिती असल्यास आपण रूग्णांच्या वेदना कमी करू शकतो तसेच त्या रूग्णाला हॉस्पीटल पर्यंत पोहचविण्यासाठी मदत करू शकतो. यासाठी आपणास आजारांची थोडक्यात माहीती असणे अवश्यक आहे. तसेच त्यांच्यावर करावयाचे प्रथमोपचार याविषयी माहिती घेतल्यास आपण रूग्णांना दिलासा देवू शकतो.

यानंतर संजूभटकर म्हणाले की, कोरोनाच्या काळात आपणास वैद्यकीय क्षेत्राचे महत्व लक्षात आले. वैद्यकीय विभागातील छोटो छोटे विविध कोर्स करून आपण रूग्ण सेवे सोबतच स्वत:चे अर्थार्जन करू शकतो. यामुळे येणाऱ्या काळाचा वेध लक्षात घेवून विद्यार्थ्यांनी वैद्यकीय क्षेत्राला प्राधान्य दिले पाहिजे. तसेच सध्याच्या काळात शासनाने दिलेल्या मास्क लावा, सामाजीक अंतरठेवा, हात धुवा या त्रीसूत्रीचा वापर करून कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी मदत करा.

करीअर करण्याची संधी
इयत्ता १० वी व १२ वी नंतर फिजीओथेरेपी, योगा आणि नॅचरोपॅथी, डीएमएलटी, डी.एन.ए, एम.पी.एच.डब्लू, ओटी असिटंट, फार्मसी असिस्टंट हे छोटे छोटो कोर्स जरी असले तरी आपल्या या कोर्स मधे करीअर करण्याची संधी आहे. कमी वेळेतच आपण स्वत: च्या पयावर उभे राहिले पाहिजे. या संधीचा लाभ घेतला पाहिजे असल्याचे मत गस सोसायटी चे माजी तज्ञ संचालक योगेश इंगळे यांनी सांगितले

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार समाधान जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सुवर्णा इंगळे, निरंजना तायडे, बबीता सिैंग, पौर्णीमा मसाने, सरोजीनी रामटेके, छाया चौधरी, मालती येवले, मंदाकीनी केदारे आदिंनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *